IPL 2020 MI vs DC: दिल्ली विरूद्ध मुंबई सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं १४३ धावांवर रोखलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी टिपत विजयात मोलाचा वाटा उचलला.
Qualifier 1. It’s all over! Mumbai Indians won by 57 runs https://t.co/E4FTqjK95p #MIvDC #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2020
नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. डी कॉक-सूर्यकुमार यादव जोडीने चांगली भागीदारी केली. क्विंटन डी कॉक ४० धावांवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तर सूर्यकुमार यादव अर्धशतकानंतर लगेचच ५१ धावांवर माघारी परतला. कायरन पोलार्ड (०), कृणाल पांड्या (१३) देखील लवकर बाद झाले. किशनने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. हार्दिकने १४ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.
२०१ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच दिल्लीला दोन धक्के बसले. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे दोघेही शून्यावर माघारी परतले. दमदार फॉर्मात असलेला शिखर धवनही शून्यावर बाद झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था शून्य धावांवर ३ गडी बाद अशी झाली. कर्णधार श्रेयस अय्यर (१२) आणि ऋषभ पंत (३) देखील परतले. त्यानंतर मार्कस स्टॉयनीस आणि अक्षर पटेल जोडीने काही काळ संघर्ष केला. स्टॉयनीसने लढाऊ वृत्ती दाखवत ६५ धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही फलंदाजीत दम दाखवत ४२ धावांची जोरदार खेळी केली. पण अखेर त्यांना ५७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.