Money transfer from Whatsapp
तंत्रज्ञान

वाह! आता Whatsapp वरून करता येणार पैसे ट्रान्सफर

पेमेंट सर्विस Whatsapp Pay ची टेस्टिंग मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसांपासून केली जात होती. व्हॉट्सअॅपने आपल्या पेमेंट सिस्टमची टेस्टिंग बीटा युजर्ससोबत फेब्रुवारी २०१८ मध्ये सुरू केली होती. आता हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याच्या मदतीने युजर्स चॅटिंग करताना आता या प्लॅटफॉर्मवर पेमेंट सुद्धा करू शकणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

व्हॉट्सअॅपला पेमेंट सर्विस भारतात सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून परवानगी मिळाली आहे. जून महिन्यामध्ये व्हॉट्सअॅपने पेमेंट सर्व्हिस सुरू केली होती. परंतु ही सेवा वापरण्याची संधी केवळ काही व्हॉट्सअॅप यूजर्सला मिळाली होती. आतादेखील NPCI ने काही मोजक्या क्रमांकाना व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. कंपनी आगामी काळात ही मर्यादा वाढवणार आहे

भारतात व्हॉट्सअॅपचा युजरबेस जवळपास ४० कोटी युजर्सचा आहे. फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले, आम्ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत काम करीत होतो. त्यामुळे प्रत्येक पेमेंटचे सिक्योर आणि विश्वासार्ह असणे गरजेचे आहे. आम्ही भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्याद्वारे असे करू शकलो आहे. याच्या मदतीने हे सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या अॅप्सवर सर्विस देणाऱ्या कंपन्यासाठी पेमेंट करू शकतील.

Whatsapp Pay भारतातील १० स्थानिक भाषेत उपलब्ध करण्यात आले आहे. अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनवर iOS आणि Android यूजर्स याचा वापर करु शकतील. यासाठी व्हॉट्सअॅप युजर्ससाठी कोणत्याही यूपीआय सपोर्टेड बँकेचे डेबिट कार्ड असणे गरजेचे आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत