Suicidal behavior with police officers
पुणे महाराष्ट्र

पोलीस अधिकाऱ्याशी जीवघेणं वर्तन; बोनेटवर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास

पिंपरी चिचंवड : महाराष्ट्र पोलिसांवरील हल्ले काही कमी होताना दिसेनात. आज पोलीस अधिकाऱ्याशीच जीवघेणं वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. गाडी रोखणाऱ्या वाहतूक पोलिसास एका चालकाने बोनेटवर बसवून एक किलोमीटरपर्यंत सुसाट प्रवास केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडिओदेखील समोर आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वाहतूक पोलिसांनी गाडी रोखण्याचा प्रयत्न केला पण तरीदेखील कार चालकाने गाडी थांबवली नाही. त्यामुळे पोलिसांनी गाडीच्या बोनेटसमोर जाऊन गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. गाडी समोर पोलीस आल्याचं पाहूनदेखील कार चालकाने गाडीचा वेग कमी केला नाही आणि चक्क एक किलोमीटरपर्यंत पोलिसासकट वेगाने प्रवास केला. नागरिकांनी आणि वाहन चालकांनी कार चालकास थांबवण्यासाठी अनेक विनवण्या केल्या पण तरीही चालकाने गाडी थांबवली नाही. अखेर दुचाकीस्वार आणि रिक्षावाल्यांच्या मदतीने पोलिसाची सूटका करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी चार वाजता अहिंसा चौक ते चिंचवड पोलीस स्टेशन मार्गावर ही ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आबासाहेब सावंत असं वाहतूक पोलिसाचं नाव आहे तर 50 वर्षीय युवराज हणवते असं कार चालकाचं नाव आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांचा प्रसंगावधान आणि सुदैव म्हणूनच सावंत यातून बालबाल बचावले. त्यांच्या पायाला मात्र गंभीर इजा झालीये. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने हणवतेवर चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. हणवते हे पिंपळे निलख येथील रहिवाशी असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत