उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जामिनावर सुटून तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीने सात वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने मुलीचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ‘७ वर्षांची मुलगी ४ […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण
दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. चिरंजीवी यांनी ट्विटरद्वारे त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितले आहे. सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. चिरंजीवी यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे कि, ‘आचार्य चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यापूर्वी मी माझी कोरोना चाचणी करुन घेतली आणि ती चाचणी पॉझिटीव्ह आली. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. मी सध्या […]
मी अभ्यास करू शकत नाही, तर मी जगू शकत नाही, असं म्हणत विद्यार्थीनीची आत्महत्या
शिक्षण बंद झालं म्हणून दिल्लीतील लेडी श्रीराम महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या, मूळ तेलंगणाची रहिवासी असलेल्या एका विद्यार्थीनीनं आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्याची रहिवासी असलेल्या ऐश्वर्या रेड्डी हिनं दिल्लीच्या लेडी श्रीराम महाविद्यालयापर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठ्या कष्टानं पाऊल टाकलं होतं. अतिशय गरीब कुटुंबातून पुढे आलेल्या हुशार ऐश्वर्यासाठी ही साधी गोष्ट […]
मुंबईतील केबलचालक समस्या मांडण्यासाठी ‘कृष्णकुंज’ वर दाखल
मुंबईतील केबलचालक आपल्या समस्या घेऊन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’ येथे भेटले. जिओ कंपनीकडून विनापरवाना कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी झाडे, रस्ते आणि वीजेच्या खांबांवरुनही केबल टाकल्या जात आहेत. जिओ कंपनीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी इन मुंबई, हॅथवे, डीजे आणि सिटी केबल या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मात्र, […]
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचा पगार आणि बोनस देणार – परिवहन मंत्री अनिल परब
एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारही देण्यात येणार आहे. तासाभरात या महिन्याचा पगार जमा होणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी तीन महिन्यांपैकी दोन महिन्यांचा पगार देणार असल्याची मोठी घोषणा अनिल परब यांनी केली आहे.
NCB कडून अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने आज बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा मारत तपास केला. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव याआधीही आले होते. एनसीबीने गेल्याच महिन्यात अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अगिसिलाओसला अटक केली होती. त्याच्याकडे चरस आणि अल्प्राजोलम टॅब्लेट आढळल्या होत्या. एनसीबीने त्याला लोणावळा येथून अटक केली होती. मिळालेल्या पुराव्यांच्या […]
आत्महत्येस ठाकरे सरकार जबाबदार असल्याचे लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मनोज अनिल चौधरी (वय ३०) असे आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मनोज चौधरी यांनी सुसाईड नोट लिहिली असून त्यामध्ये ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. […]
अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात राज्यपालांनी गृहमंत्र्यांना दिल्या सूचना
रिपब्लिकन टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर ही लोकशाहीची गळचेपी असल्याचा आरोप होत आहे. अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना मागील बुधवारी सकाळी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली […]
प्रसिद्ध कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचं निधन
मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेते राजीव निगम यांच्या नऊ वर्षीय मुलाचं निधन झालं. स्वतः राजीव यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. काल ८ नोव्हेंबर रोजी राजीव यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाने अखेरचा श्वास घेतला. मुलाच्या मृत्यूने राजीव यांच्या घरात शोककळा पसरली आहे. मुलाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत राजीव निगम यांनी फेसबुकवर एक पोस्ट […]
धक्कादायक : मित्रानेच केला चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
पुणे : चोरलेला मोबाइल पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले म्हणून रागाच्या भरात मित्राने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. सौरभ भगत (वय २१) आणि अजय प्रजापती (वय २०) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेत सूरज कामथे (वय २९) ही […]










