friend tried to kill with a knife

धक्कादायक : मित्रानेच केला चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे

पुणे : चोरलेला मोबाइल पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले म्हणून रागाच्या भरात मित्राने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. सौरभ भगत (वय २१) आणि अजय प्रजापती (वय २०) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या घटनेत सूरज कामथे (वय २९) ही व्यक्ती जखमी झाली आहे. कामथे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व कामथे ओळखीचे आहेत. कामथे यांनी त्यांचे सिमकार्ड आरोपीला वापरण्यासाठी दिले होते. आरोपीने ते सिमकार्ड वापरून कामथे यांना परत दिले. त्यानंतर कामथे यांना राजगड पोलिसांचा फोन आला. त्यांच्या नावाचे सिमकार्ड टाकलेला मोबाइल चोरीचा असल्याचे सांगून तो पोलिस ठाण्यात आणून जमा करण्याची सूचना पोलिसांनी त्यांना केली.

मोबाइल पोलिसांत जमा करण्याचे सांगितल्याबाबत विचारणा करण्यासाठी कामथे आरोपीच्या घरी गेले होते. त्याचा राग मनात धरून आरोपीने चाकूने कामथेंना मानेजवळ, पाठीवर, छातीवर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आसपासचे नागरिक मध्ये आले, तेव्हा त्यांच्यावरही चाकू उगारला. रस्त्यावरील गोंधळामुळे नागरिकांनी भीतीने दुकाने बंद केली. या प्रकरणी कामथे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सहायक निरीक्षक के. बी. पावसे अधिक तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत