मुंबईतील केबलचालक आपल्या समस्या घेऊन आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या निवासस्थानी ‘कृष्णकुंज’ येथे भेटले. जिओ कंपनीकडून विनापरवाना कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी झाडे, रस्ते आणि वीजेच्या खांबांवरुनही केबल टाकल्या जात आहेत.
जिओ कंपनीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी इन मुंबई, हॅथवे, डीजे आणि सिटी केबल या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मात्र, जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात आल्याचे गाऱ्हाणे केबलचालकांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडले.