सॅमसंगने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात Samsung Galaxy Note 10 वर देखील बेस्ट डील मिळत आहे. सॅमसंगने गॅलेक्सी नोटच्या किंमतीत २७ हजार ६९५ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता या फोनची किंमत ४५ हजार रुपये झाली आहे. ऑफलाइन किंवा रिटेलवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हा फोन कमी किंमतीत मिळणार आहे. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील वाद पोहोचला उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत
सातारा : ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं केलेल्या आरोपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या हा वाद चर्चेत असून, मालिकेच्या चित्रीकरणालाही गावकऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणी अभिनेत्री अलका कुबल यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची रविवारी भेट घेतली. सातारा […]
डेविड वॉर्नरने सांगितलं सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाचं कारण
इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवले. या पराभवानंतर SRH चा कर्णधार डेविड वॉर्नरने पराभवाला खराब क्षेत्ररक्षण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. डेविड वॉर्नर म्हणाला, जर आपण सामन्यात कॅच सोडत असू तर आपण मॅच जिंकू शकत नाही. मला वाटतं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आम्ही खराब सुरुवातीनंतरही सामन्यात वापसी केली […]
DC vs SRH दिल्लीचा विजय; अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार
अबुधाबी : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी फायनल होणार आहे. शिखर धवनची अर्धशतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरच्या फटकेबाजीच्या आधारावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 78 धावांची खेळी केली. […]
IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून घेतला प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय
IPL च्या 13 व्या मोसमातील क्वालिफायर 2 सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळण्यात येणार आहे. ही मॅच अबुधाबीतील शेख झायेद आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
उत्तर प्रदेश : छेड काढणाऱ्यांचा विरोध केला म्हणून मुलीला जिवंत जाळले
उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या मुलीला जाळल्याचे समोर आले आहे. मुलगी आगीत सापडल्याचे पाहून तिला वाचवायला गेलेले त्या मुलीचे वडील देखील भाजले आहेत. सध्या जखमी विद्यार्थीनीस वाराणसी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिकवणीसाठी निघालेल्या मुलीची काही गुंडांनी छेड काढली. मुलीने विरोध केल्यामुळे या गुंडांनी नंतर […]
लवकरच नियमांसह मंदिरं उघडली जातील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरुन राज्यातील नागरिकांना संबोधित केलं. ते म्हणाले, आपण सर्व सण साधेपणाने साजरे केले. सर्व जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नागरिकांच्या सहकार्यामुळे आज आपण थोडेसे तणावमुक्त आहोत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमिवर गर्दी वाढत आहे. सगळे व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. राज्यात सगळीकडे कोरोना कमी होत चालला आहे. मात्र आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दिवाळीमध्ये […]
कोरोनाची दुसरी लाट ही लाट नाही तर त्सुनामी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. कोरोनाबाबत काळजी घेण्याविषयी सांगताना ते म्हणाले कि, कोरोनाची दुसरी लाट आली तर ती लाट नाही त्सुनामी असेल. उद्धव ठाकरे म्हणाले की, 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्ल्यू आला होता. त्याही वेळेला काही कोटी बळी गेले होते. असं म्हणतात आपल्या देशात 1 कोटींच्या आसपास लोक बळी गेले होते. तेंव्हाची […]
डोनाल्ड ट्रम्प यांचं राष्ट्रपतीपद तर गेलंच, आता मेलेनिया ट्रम्प घेणार घटस्फोट
अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांची निवड झाली आहे. त्यामुळे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पायउतार व्हावं लागणार आहे. यातच आता ट्रम्प यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मेलेनिया ह्या डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे. स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्यानं डेली […]
Infinix Smart 4 आज पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
Infinix ने नुकताच आपला बजेट फोन Infinix Smart 4 भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल आज (८ नोव्हेंबर) रोजी सुरू होणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजता हा हँडसेट सेलसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. इनफिनिक्स स्मार्ट ४ हा फोन भारतात ६ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आला आहे. फोन मिडनाइट ब्लॅक, […]









