अबुधाबी : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी फायनल होणार आहे. शिखर धवनची अर्धशतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरच्या फटकेबाजीच्या आधारावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 189 धावा केल्या.
दिल्लीकडून शिखर धवनने 78 धावांची खेळी केली. मार्कस स्टॉयनीसने 38 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने 21 धावा केल्या. शिमरॉनने 42 धावा केल्या. मार्कस स्टॉयनीसने अष्टपैलू कामगिरी केली. आता १० नोव्हेंबरला अंतिम सामन्यात दिल्लीपुढे मुंबईचे आव्हान असणार आहे. मार्कस स्टोइनिस मॅन ऑफ द मॅच झाला. त्याने दिल्लीकडून फलंदाजी करताना २७ चेंडूत ३० धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होता. तसेच गोलंदाजी करताना ३ ओव्हरमध्ये २६ धावा देत सलामीवीर प्रियम गर्ग, मनिष पांडे आणि अर्धशतकवीर केन विल्यमसन या तिघांना बाद केले.
Here it is! @DelhiCapitals win by 17 runs and march into the finals of #Dream11IPL 2020. pic.twitter.com/RRL8Ez8x1h
— IndianPremierLeague (@IPL) November 8, 2020
१९० धावांच्या पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर २ धावांवर त्रिफळाचीत झाला. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या प्रियम गर्ग (१७) आणि मनिष पांडे (२१) या दोघांना स्टॉयनीसने एका षटकात माघारी पाठवले. अनुभवी जेसन होल्डर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ११ धावांवर बाद झाला. युवा अब्दुल समदसह महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसनने अर्धशतक पूर्ण केलं. पण त्याचे प्रयत्न तोकडे पडले. सनरायजर्स हैदराबाद २० ओव्हरमध्ये ८ बाद १७२ धावा करू शकले. यामुळे क्वालिफायर टू मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा १७ धावांनी विजय झाला.