सातारा : ‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील अलका कुबल आणि प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद आता खासदार उदयनराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचला आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं केलेल्या आरोपावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सध्या हा वाद चर्चेत असून, मालिकेच्या चित्रीकरणालाही गावकऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकरणी अभिनेत्री अलका कुबल यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांची रविवारी भेट घेतली.
सातारा चित्रीकरणाच्या सेटवर ची सर्व वस्तुस्थिती अलका कुबल यांनी उदयनराजे भोसले यांच्यासमोर मांडली. यानंतर उदयनराजेंनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सोबत मोबाईलवरून चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली. काही संघटनांनी मागणी केली आहे कि, अभिनेत्री अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाड यांची माफी मागावी तसेच मालिकेतील प्रमुख कलाकार विवेक सांगळेला मालिकेतून काढून टाकावे. असे झाले नाही तर साताऱ्यात सुरु असलेलं मालिकेचं चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी देखील दिली आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी आज उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीची माहिती उदयनराजे भोसले यांनी ट्विट करून दिली.
जेष्ठ अभिनेत्री सौ अलका कुबल यांनी आज भेट घेतली काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी चर्चा केली हा वाद लवकरच मिटवून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली. pic.twitter.com/OZM7XY2RU9
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) November 8, 2020