Hitman Rohit Sharma Australia tour
क्रीडा

हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माची निवड न केल्याबद्दल गेल्या काही दिवसात रोहितचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. रोहितला दुखापतीमुळे संघात घेतले नाही असे म्हटले जात होते. त्यानंतर रोहित आयपीएलमधील अखेरची साखळी लढत आणि क्वालिफायर १ च्या लढतीत मैदानावर दिसला होता. त्यानंतर बीसीसीआयने सांगितले होते कि, रोहित फिट असेल तर नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. […]

Mayuri Deshmukh makes a fresh start
मनोरंजन

दु:ख सावरत मयुरी देशमुख करतेय छोट्या पडद्यावर नवी सुरुवात,

खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. तिचा पती आशुतोष भाकरेच्या आत्महत्येनंतर तीन महिन्यांनी मयुरी नवी सुरुवात करत आहे. स्टार प्लस वाहिनीवरील ‘इमली’ या मालिकेत मयुरी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असून या मालिकेच्या निमित्ताने तिने हिंदीत पदार्पण केलं आहे. यामध्ये ती अभिनेता गश्मीर महाजनीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. ‘फोर लायन्स’ निर्मिती संस्था […]

Arnav Goswami sent to Taloja Jail
देश महाराष्ट्र

अर्णव गोस्वामी यांची तळोजा कारागृहात रवानगी; माझा जीव धोक्यात आहे – अर्णव गोस्वामी

रायगड : अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी त्यांचे वकील आणि घरचे लोक सातत्याने येत आहेत. यावेळी अर्णव यांच्यापर्यंत मोबाईल फोन पोहोचवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. परिणामी अर्णव गोस्वामी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी असल्याचे निष्पन्न झाले.भविष्यात […]

IPL 2020 Second Qualifier: Delhi vs Hyderabad
क्रीडा

IPL 2020 दुसरा क्वालिफायर : आज दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना

आयपीएलच्या १3 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आज दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात ७.३० वाजता अबुधाबी येथे खेळला जाईल. या सामन्यातील विजयी संघ 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये मुंबई इंडियन्स बरोबर अंतिम सामना खेळेल. हा सामना जिंकून दिल्लीला त्यांचा पहिला फायनल सामना खेळण्याची संधी मिळेल. आकडेवारीकडे बघितले तर हैदराबाद मजबूत स्थितीत आहे. लीग फेरीत हैदराबाद संघ […]

Fastag mandatory for all four-wheelers
देश

सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य

सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री १ डिसेंबर २०१७ च्या अगोदर झालेली आहे, अशा वाहनांसाह M व N कॅटेगिरीतील वाहनांना देखील लागू असणार आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ […]

womens t20 challenge 2020 : supernovas beat trailblazers
क्रीडा

Women’s T20 Challenge : सुपरनोवाजची ट्रेलब्लेझर्सवर 2 धावांनी मात, फायनलमध्ये स्थान निश्चित

शारजा : सुपरनोवाजने ट्रेलब्लेझर्सवर 2 धावांनी मात केली आहे. सुपरनोवाजने ट्रेलब्लेझर्सला विजयासाठी 147 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ट्रेलब्लेझर्सला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 144 धावाच करता आल्या. या सामन्यात विजय मिळवून सुपरनोवाजने फायनल मध्ये स्थान निश्चित केले आहे. #Trailblazers and #Supernovas will face each other in the Final of #JioWomensT20Challenge on November 9. pic.twitter.com/ckNrsMMVDK […]

Joe Biden's speech
ग्लोबल

अखेर सातारा पॅटर्न यशस्वी, जो बायडन होणार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष

जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला असून तेच अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. काही वेळापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ही निवडणूक जिंकल्याचा दावा एका ओळीचं ट्विट करुन केला होता. मात्र प्रत्यक्षात जो बायडन यांनी ही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष हे जो बायडनच होतील यात काही शंका […]

Murder of a father
देश

मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला विरोध करणाऱ्या पित्याची हत्या

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात अतिशय घृणास्पद प्रकार घडला आहे. आपल्या मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला विरोध केल्यामुळे त्या मुलीच्या वडिलांना छेडछाड करणाऱ्या गुंडांनी बेदम मारहाण करुन ठार मारल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीची त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने छेड काढली. यामुळे रागावलेल्या मुलीच्या वडिलांनी छेड काढणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लगावली होती. यानंतर आरोपी काही लोकांना […]

RCB team captain needs to be changed
क्रीडा

RCB चा कर्णधार बदलणं गरजेचं, संघाच्या मॅनेजमेंट आणि मालकांनी निर्णय घ्यावा – संजय मांजरेकर

विराट कोहलीच्या RCB संघाचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. संघाच्या पराभवानंतर विराट कोहलीने RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. यातच आता संजय मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे जात RCB च्या टीम मॅनेजमेंटला विराट कोहलीबद्दल निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे. “आता ही गोष्ट कर्णधारावर अजिबात अवलंबून राहिलेली नाही. याबद्दल टीम […]

Special campaign to give certificates to orphans
महाराष्ट्र

अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहीम, अनाथ मुलांच्या अडचणी होतील कमी

शासकीय किंवा मान्यताप्राप्त स्वयंसेवी बालगृहातून बाहेर पडणाऱ्या अनाथ मुलांना विविध शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आदी सवलतींच्या लाभासाठी अनाथ प्रमाणपत्र गतिमान पद्धतीने देण्याचे महिला व बालविकास विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यभरात येत्या दि. 14 ते 30 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय, स्वयंसेवी […]