Hitman Rohit Sharma Australia tour
क्रीडा

हिटमॅन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहित शर्माची निवड न केल्याबद्दल गेल्या काही दिवसात रोहितचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. रोहितला दुखापतीमुळे संघात घेतले नाही असे म्हटले जात होते. त्यानंतर रोहित आयपीएलमधील अखेरची साखळी लढत आणि क्वालिफायर १ च्या लढतीत मैदानावर दिसला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

त्यानंतर बीसीसीआयने सांगितले होते कि, रोहित फिट असेल तर नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. यातच आता चांगली बातमी आली आहे की हिटमॅन रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. रोहितने निवड समितीला स्पष्टपणे सांगितले आहे की तो फिट आहे. आयपीएल झाल्यानंतर रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तो चार्टर्ड फ्लाइटने ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १० नोव्हेंबर रोजी ते पाचव्या विजेतेपदासाठी मैदानात उतरतील.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत