womens t20 challenge 2020 : supernovas beat trailblazers

Women’s T20 Challenge : सुपरनोवाजची ट्रेलब्लेझर्सवर 2 धावांनी मात, फायनलमध्ये स्थान निश्चित

क्रीडा

शारजा : सुपरनोवाजने ट्रेलब्लेझर्सवर 2 धावांनी मात केली आहे. सुपरनोवाजने ट्रेलब्लेझर्सला विजयासाठी 147 धावांचे आव्हान दिले होते. मात्र ट्रेलब्लेझर्सला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 144 धावाच करता आल्या. या सामन्यात विजय मिळवून सुपरनोवाजने फायनल मध्ये स्थान निश्चित केले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुपरनोवाजने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सुपरनोवाजने 20 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 146 धावा केल्या. सुपरनोवाजकडून चमारी अट्टापट्टूने सर्वाधिक चमारीने 48 चेंडूत 5 फोर आणि 4 सिक्ससह 67 धावांची खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने 31 धावा केल्या. तसेच प्रिया पुनियाने 30 धावा केल्या. ट्रेलब्लेझर्स कडून सलमा खातून, हर्लिन देओल आणि झुल गौस्वामीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

ट्रेलब्लेझर्सकडून कर्णधार स्मृती मंधानाने 33 धावांची खेळी केली. तर दिप्ती शर्माने सर्वाधिक नाबाद 43 धावा केल्या. तसेच डीन्ड्रा डॉटिन आणि हर्लिन देओल या दोघींनी प्रत्येकी 27 धावा केल्या. सुपरनोवाजकडून राधा यादव आणि शकेरा सेलमॅन या जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर अनुजा पाटीलने 1 विकेट घेतली.

10 नोव्हेंबरला ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज यांच्यात अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. हा अंतिम सामना शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. ही फायनल मॅच संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत