Big discount on Samsung Galaxy Note 10

Samsung Galaxy Note 10 वर २७ हजार ६९५ रुपयांची मोठी सूट, जाणून घ्या

गॅझेट्स तंत्रज्ञान

सॅमसंगने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या अनेक स्मार्टफोनवर जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात Samsung Galaxy Note 10 वर देखील बेस्ट डील मिळत आहे. सॅमसंगने गॅलेक्सी नोटच्या किंमतीत २७ हजार ६९५ रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे आता या फोनची किंमत ४५ हजार रुपये झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ऑफलाइन किंवा रिटेलवरून खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हा फोन कमी किंमतीत मिळणार आहे. ऑनलाइन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फोनसोबत डिस्काउंट तर मिळत आहे. परंतु, ऑफलाइन खरेदीवर जास्त फायदा आहे. Samsung Galaxy Note 10 ची किंमत लाँचिंगवेळी ६९ हजार ९९९ रुपये होती. सध्या या फोनची किंमत अधिकृत वेबसाईटवर ५७ हजार १०० रुपये आहे. परंतु, रिटेल स्टोरवर याची किंमत ४५ हजार रुपये आहे. तर अॅमेझॉनवर याची किंमत ७३ हजार ६०० रुपये आहे.

Samsung Galaxy Note 10 ची वैशिष्ट्ये :

  1. हा फोन ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटसह आहे.
  2. या फोनमध्ये ६.३ इंचाचा Infinity-O Dynamic AMOLED डिस्प्ले दिला आहे. याची स्क्रीन रिझॉल्यूशन 2280×1080 पिक्सल आहे.
  3. या फोनमध्ये Exynos 9825 SoC प्रोसेसर दिला आहे.
  4. फोन अँड्रॉयड ९ आणि अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमसोबत लाँच
  5. सॅमसंग गॅलेक्सी नोट १० मध्ये 3,500mAh ची बॅटरी दिली आहे. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
  6. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात लाइव फोकस व्हिडिओ, झूम इन माइक, सुपर स्टीडी, हायबरलेप्स, एआर डूडल आणि नाइट मोड सह अनेक आकर्षक फीचर्स दिले आहेत.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत