T-Series become first and only youtube channel in the world to cross 200 millions subscribers

YouTube वर जगातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेला चॅनल बनला T-Series, भारतीय म्युजिक कंपनीचे मोठे यश

तंत्रज्ञान मनोरंजन

T-Series : भारतीय म्युजिक कंपनी T-Series ने एक नवीन यश संपादन केले आहे. T-Series चे YouTube चॅनल जगातील सर्वाधिक सब्सक्राइबर्स असलेला चॅनल बनला आहे. YouTube वर 200 दशलक्ष किंवा 200 दशलक्षाहून अधिक सदस्य असलेला हा जगातील एकमेव आणि पहिला चॅनेल बनला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भूषण कुमार यांचा T-Series हा संगीत जगतात एक प्रसिद्ध ब्रँड आहे. आता त्याने सोशल मीडियावरही आपल्या लोकप्रियतेचा ध्वज फडकावला आहे. T-Series च्या YouTube चॅनेलमध्ये कितीतरी भाषा आणि शैलींमध्ये 29 चॅनेल आहेत. या सर्वांचे मिळून 718 अब्ज पेक्षा जास्त व्ह्यूज असलेले 383 दशलक्ष सब्सक्राइबर आहेत. YouTube भारतात खूप लोकप्रिय आहे आणि या कंपनीच्या कमाईत भारतीय प्रेक्षक आणि निर्माते यांचा मोठा वाटा आहे. आता भूषण कुमार यांनी हे सिद्ध केले आहे की यूट्यूबवर त्यांचे कन्टेन्ट लोकप्रिय असून त्यांच्या चाहत्यांची कमतरता नाही.

टी-सीरीजचे अध्यक्ष आणि संचालक भूषण कुमार यांनी ही मोठी कामगिरी सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की ही कामगिरी उत्साहवर्धक आहे आणि सर्व भारतीयांसाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे, कारण भारतीय चॅनल YouTube वर 200 दशलक्ष सदस्यांचा आकडा पार करणारे पहिले चॅनल बनले आहे. टी-सीरीज केवळ उत्कृष्ट संगीतासाठीच ओळखली जात नाही, तर त्याच्या बॅनरखाली अनेक चित्रपटही सातत्याने बनवले जात आहेत.

T-Series चा प्रवास

संगीत कंपनी T-Series ची स्थापना संगीतकार गुलशन कुमार यांनी 1983 मध्ये केली होती. लवकरच ही कंपनी देशातील सर्वात मोठी म्युजिक कॅसेट बनवणारी कंपनी बनली. आजही त्याचे नाव सर्वोत्तम म्युजिक कंपन्यांमध्ये समाविष्ट आहे. T-Series ने 15 वर्षांपूर्वी 2006 मध्ये YouTube वर आपले चॅनल क्रिएट केले होते. या चॅनेलद्वारे आतापर्यंत 16,000 हून अधिक व्हिडिओ अपलोड केले गेले आहेत, जे 172 अब्जांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहेत. T-Series चे YouTube वर विविध भाषा आणि श्रेणींमध्ये एकूण 29 इतर चॅनेल आहेत. T-Series सह सर्व 30 चॅनेलचे 383 दशलक्ष (38.3 कोटी) पेक्षा जास्त सब्सक्राइबर आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत