Congress worker shot dead in Pune
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुण्यात तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या, समोर आली धक्कादायक माहिती

पुणे : पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुण बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी व्यावसायिकावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून जवळच ही घटना घडली. समीर मनूर शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. चंद्रभागा चौकात मारेकऱ्यांनी तब्बल 6 गोळ्या घालून समीरचा खून केला आहे. समीरची हत्या आर्थिक कारणातून झाल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक समीर मनूर शेख याने आरोपी मेहबूब बलुर्गी या आपल्या मित्राकडून 5 लाख रुपये उसने घेतले होते. मृत समीर याने यातील अडीच लाख रुपये मेहबूबला परत दिले. पण उरलेले पैसे देण्यासाठी मात्र समीर टाळाटाळ करत होता. मृत समीर अंगावर भरपूर सोनं घालून ‘गोल्डमॅन’ बनून फिरायचा, पण पैसे द्यायला टाळाटाळ करत असल्यामुळे मेहबूबचा समीरवर राग होता. मेहबूबने दोन महिन्यांपूर्वी समीरची गळ्यातील सोन्याची चैन ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दोघांमधील वाद चांगलाच वाढत गेला. यातूनच मेहबूबने समीरचा पाठलाग करून त्याची हत्या केली. आरोपीनं समीरला पाठीमागून पकडून जवळून 6 गोळ्या घातल्या. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहबूबला ताब्यात घेतलं आहे. दोन आरोपी फरार असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत