Flipkart Big Saving Days Sale Bumper Offer On Google Pixel 4a Smartphone

मस्तच! Google Pixel 4a स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, ५ हजार रुपयांची मोठी सूट

गॅझेट्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : Google Pixel 4a स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. त्यावेळी Google Pixel 4a च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये होती. मात्र, आता आपण हा स्मार्टफोन ५ हजार रुपये सूटसह २६,९९९ रुपयात खरेदी करू शकणार आहात.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Google pixel 4a स्मार्टफोन Flipkart Big Saving Days Sale मध्ये या ऑफरसह खरेदी करता येईल. हा सेल १३ जून ते १६ जूनपर्यंत सुरु राहील. त्याचबरोबर या फोनवर सेलमध्ये SBI क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट तर फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर ५ टक्के कॅशबॅक ऑफर मिळत आहे.

Google pixel 4a चे स्पेसिफिकेशन्स :

 1. Google Pixel 4a स्मार्टफोनमध्ये ५.८१ इंच फुल एचडी+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
 2. स्क्रिन रिझॉल्यूशन २३४०x १०८० पिक्सल
 3. आस्पेक्ट रेशियो १९:५:९
 4. स्मार्टफोन ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon ७३०G चिपसेटसोबत येतो.
 5. अँड्राइड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
 6. या स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोन ड्यूल एक्सपोजर कंट्रोलसोबत एचडीआर+ सपोर्ट, पोर्ट्रेट मोड, टॉप शॉट, नाइट साइट सोबत येतो. यात ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.
 7. रियर पॅनेलवर फिंगरप्रिंट सेंसर
 8. यात १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ३,१४० mAh बॅटरी मिळते.
 9. फोनमध्ये एक यूएसबी टाइप-सी मिळेल.
 10. नॉयस सप्रेशन सपोर्टसोबत स्टीरियो स्पीकर आणि दोन मायक्रोफोन आहेत.
 11. फोनचे डायमेंशन १४४x69.४x८,२ मिलीमीटर आणि वजन १४३ ग्रॅम आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत