David Warner explained the reason for defeat
क्रीडा

डेविड वॉर्नरने सांगितलं सनरायझर्स हैदराबादच्या पराभवाचं कारण

इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालिफायर 2 सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवले. या पराभवानंतर SRH चा कर्णधार डेविड वॉर्नरने पराभवाला खराब क्षेत्ररक्षण जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

डेविड वॉर्नर म्हणाला, जर आपण सामन्यात कॅच सोडत असू तर आपण मॅच जिंकू शकत नाही. मला वाटतं फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये आम्ही खराब सुरुवातीनंतरही सामन्यात वापसी केली होती. मात्र खराब क्षेत्ररक्षण आमच्या पराभवाचं कारण ठरलं. या सामन्यात दिल्लीचे सलामीवीर शिखर धवन आणि मार्कस स्टॉयनिस या दोघांचेही झेल सुटले. धवनने 50 चेंडूत 78 तर स्टॉयनिसने 27 चेंडूत 38 धावा केल्या आणि संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. पराभवानंतर वॉर्नर म्हणाला कि, आयपीएल 2020 चा प्रवास चांगला झाला. तिसऱ्या स्थानी राहाणं अभिमानाची बाब आहे, कारण कुणीही असा विचार केला नव्हता की आम्ही तिसऱ्या स्थानी राहू शकू.

दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा 17 धावांनी पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाचं फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. शिखर धवनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने 20 षटकात 189 धावांचे लक्ष्य उभारले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ 172 धावापर्यंतचं मजल मारु शकला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत