girl was burned alive

उत्तर प्रदेश : छेड काढणाऱ्यांचा विरोध केला म्हणून मुलीला जिवंत जाळले

देश

उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. छेड काढणाऱ्यांचा विरोध करणाऱ्या मुलीला जाळल्याचे समोर आले आहे. मुलगी आगीत सापडल्याचे पाहून तिला वाचवायला गेलेले त्या मुलीचे वडील देखील भाजले आहेत. सध्या जखमी विद्यार्थीनीस वाराणसी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिकवणीसाठी निघालेल्या मुलीची काही गुंडांनी छेड काढली. मुलीने विरोध केल्यामुळे या गुंडांनी नंतर तिच्या घरात घुसून तिला जिवंत जाळले. मुलीची अवस्था बघून तिला वाचवण्यास गेलेले तिचे वडील देखील भाजले गेले. बलियामधील दुबहड ठाणे परिसरातील नगवा गावात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पीडित विद्यार्थीनीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. तिच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसांपासून तिला एक तरूण त्रास देत होता. त्याचे म्हणने न ऐकल्यास तिचे आयुष्य उद्धवस्त करण्याची धमकी देखील देत होता. नातेवाईकांनी आरोप केला आहे की, या तरूणाने शनिवारी घरात घुसून तिला जिवंत जाळले. या अगोदर बलियाचा शेजारील जिल्हा असलेल्या देवरिया येथे छेडछाडीस विरोध करणाऱ्या मुलीच्या वडिलांची मारहाण करून हत्या करण्यात आली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत