Infinix Smart 4 available for sale
गॅझेट्स तंत्रज्ञान

Infinix Smart 4 आज पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Infinix ने नुकताच आपला बजेट फोन Infinix Smart 4 भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल आज (८ नोव्हेंबर) रोजी सुरू होणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजता हा हँडसेट सेलसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इनफिनिक्स स्मार्ट ४ हा फोन भारतात ६ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आला आहे. फोन मिडनाइट ब्लॅक, ओशन वेव, स्यान आणि वॉयलेट कलरमध्ये येतो. फ्लिपकार्ट वरून अॅक्सिस, सिटी, आयसीआयसीआय आणि कोटक महिंद्रा बँकेच्या क्रेडिट तसेच डेबिट कार्ड वर फोन खरेदी केल्यास ५ ते १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच नो-कॉस्ट ईएमआई ऑफर देखील उपलब्ध आहे.

Infinix Smart 4 स्पेसिफिकेशन्स :

  1. या फोनमध्ये ६.८२ इंचाचा एचडी+ इनसेल आयपीएस डिस्प्ले आहे.
  2. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो ए २२ प्रोसेसर दिला आहे.
  3. २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे.
  4. फोटोग्राफीसाठी इन्फिनिक्स स्मार्ट 4 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 13 मेगापिक्सलचे प्रायमरी व डेप्थ सेंसर आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
  5. या फोनध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, फोन ३८ तासांपर्यंत ४ जी टॉकटाईम, ४४ तासांपर्यंत म्यूझिक प्लेबॅक टाइम आणि २३ तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक मिळू शकतो.
  6. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, वाय-फाय 802.11 ए / बी / जी / एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस / ए-जीपीएस, मायक्रो-यूएसबी पोर्ट, 3.5 मिमी हेडफोन जॅक आहे.
  7. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत