NCB raids actor Arjun Rampal's Mumbai home

NCB कडून अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा

मनोरंजन

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ने आज बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालच्या मुंबईतील घरात छापा मारत तपास केला. बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव याआधीही आले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एनसीबीने गेल्याच महिन्यात अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्सचा भाऊ अगिसिलाओसला अटक केली होती. त्याच्याकडे चरस आणि अल्प्राजोलम टॅब्लेट आढळल्या होत्या. एनसीबीने त्याला लोणावळा येथून अटक केली होती. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर अर्जुन रामपालच्या घरावर छापा टाकण्यात आला. अर्जुनच्या ऑफिसमध्येही तपास केला जात आहे. अर्जुन रामपालच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले आहे. अशीदेखील माहिती मिळत आहे.

बॉलिवूड सातत्याने नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या रडारवर आहे. याआधी ७-८ नोव्हेंबरच्या रात्री तपास एजन्सीने अनेक ड्रग्स पॅडलर्सच्या घरी छापा टाकला होता तसेच अनेकांना अटक केली होती. याशिवाय प्रकरणात दीपिका पदुकोणची एक्स मॅनेजर करिश्मा प्रकाशची अंतरिम जामिनाची याचिका १० नोव्हेंबरपर्यंत स्थगित केली होती. NCB ने रविवारी निर्माता फिरोज नादियादवाला यांची पत्नी शबादा सईदला देखील अटक केली होती. फिरोज नादियादवाला यांचीही चौकशी सुरु आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत