भोपाळ : भोपाळमधील कोलार येथील स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली. येथे स्पा सेंटरच्या आडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सेंटरमधून स्पा सेंटरचा मॅनेजर आणि तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरमध्ये तीन महिला आणि पुरूष आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. तसेच सेंटरमध्ये […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद अध्यादेशातंर्गत पहिली अटक
उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद विरोधात नवीन अध्यादेश लागू करण्यात आला आहे. बरेलीमध्ये या अध्यादेशातंर्गत पहिला एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणात आरोपी ओवैस अहमदला (२१) बुधवारी अटक करण्यात आली. हिंदू मुलीला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचा तसेच मुलीच्या पालकांनी धर्मांतरावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ओवैसचे हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मागच्यावर्षी ते पळून गेले. […]
सुपरस्टार रजनीकांत ३१ डिसेंबरला करणार राजकीय पक्षाची घोषणा
सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. आज (गुरूवारी) रजनीकांत यांनी ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. तसंच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असंही सांगितलं. यापूर्वी सोमवारी त्यांनी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची भेट घेतली होती. तसंच […]
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची आजपासून नियमित सुनावणी होणार
2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची नियमित सुनावणी 3 डिसेंबरपासून सुरू होत असल्यानं या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर सर्व आरोपींना कोर्टात हजेरी लावण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं जारी केले आहेत. या प्रकरणात जवळपास ४७५ साक्षीदार आहेत. परंतु आतापर्यंत फक्त १४ साक्षीदारांच्या जबाब नोंदवण्यात आला आहे. १२ वर्ष झाली तरी हे प्रकरण […]
मुंबई लोकल संदर्भात मोठा निर्णय, लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी
लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते. बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. “येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. […]
WHO ने फेस मास्कच्या वापराबाबत जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
जागतिक आरोग्य संघटनने बुधवारी फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. WHO ने सल्ला दिला आहे की, ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथल्या आरोग्य केंद्रांवर प्रत्येक व्यक्तीने फेस मास्क घालणं बंधनकारक आहे. WHO च्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात देण्यात आलेल्या सूचना : ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे […]
विधानपरिषद पोटनिवडणुक : धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल विजयी, महाविकास आघाडीला धक्का
धुळे : धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. धुळे-नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा २३४ मतांनी पराभव झाला. अमरीश पटेल यांना ३३२ मते मिळाली आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मतं मिळाली. चार मते बाद झाली. या निवडणुकीत […]
ब्रेकिंग : MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन
मुंबई : MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. आज (३ डिसेंबर)पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 98 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सियालकोट इथे 1919 साली पहिल्यांदा मसाल्यांचा एक छोटा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर […]
महाविकास आघाडी सरकारचा ऐतिहासिक व क्रांतिकारी निर्णय; सर्व स्तरातून कौतुक..
मुंबई : राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने आज मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला असून, महाराष्ट्रात आता वस्त्यांना जातीवाचक नावे देण्याची प्रथा हद्दपार करण्यात आली आहे. वस्त्यांना जातीऐवजी महापुरुषांची नावे द्यावीत असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे […]
बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर प्रेयसीने रागाच्या भरात केले ‘हे’ धक्कादायक कृत्य
बिहार : नालंदामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर रागाच्या भरात त्याच्या प्रेयसीने त्याच्या पत्नीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. नातेवाईकांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर राग अनावर झालेली त्याची गर्लफ्रेंड मंगळवारी रात्री त्यांच्या घरात घुसली. तिने […]










