मुंबई : MDH चे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. आज (३ डिसेंबर)पहाटे 5.38 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 98 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर महाशय धर्मपाल यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
सियालकोट इथे 1919 साली पहिल्यांदा मसाल्यांचा एक छोटा व्यवसाय सुरू केला होता. फाळणीनंतर गुलाटी कुटुंबीय दिल्लीत आले. सुरुवातीला त्यांच्या वडिलांनी कुटुंब चालवण्यासाठी टांगाचालक म्हणून काम केलं होतं. थोडे पैसे जमल्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी लाकडाच्या लहान पेटीतून मसाले विकण्यास सुरुवात केली आणि हा व्यवसाय पुढे वाढवत नेला. सध्याच्या घडीला MDH मसाले भारतात सर्वात प्रसिद्ध आहेत. हे मसाले देश विदेशात पोहोचले आहेत.