The party whose Chief Minister has not won a single seat - Devendra Fadnavis
महाराष्ट्र

ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्यांची एकही जागा निवडून आली नाही – देवेंद्र फडणवीस

राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपला औरंगाबादसह पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला आहे. आम्हाला चांगल्या जागांची अपेक्षा […]

People showed BJP their 'place' - Rohit Pawar
महाराष्ट्र

जनतेने भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली – रोहित पवार

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालात महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढल्यानं भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. भाजपला औरंगाबादसह पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघही गमवावा लागला आहे. पदवीधरच्या या तिन्ही मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर पुणे शिक्षक मतदारसंघातही राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला आहे. विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार […]

The Indian economy is recovering - International Monetary Fund
देश

कोरोनाच्या काळात झालेल्या हानीतून भारतीय अर्थव्यवस्था सावरत आहे – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

कोरोनाच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठं नुकसान सहन करावं लागलं. त्यातून भारतीय अर्थव्यवस्था आता सावरत आहे, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं (International Monetary Fund) गुरुवारी सांगितलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सप्टेंबरच्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा झाल्याचं दिसून आलं. उपभोक्त्यांच्या वाढत्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेला अजून गती येण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत 23.9 टक्क्यांनी […]

Legislative Council Graduate and Teacher Constituency Results
महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधरमध्ये महाविकास आघाडीची सरशी, जाणून घ्या कुठं कोण आहे आघाडीवर

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांवर महाविकास आघाडीने सरशी केली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजय मिळवला तर पुणे पदवीधर मतदारसंघातुन महाविकास आघाडीच्या अरुण लाड यांनी पहिल्या फेरीत विजयासाठी आवश्यक असलेली मते मिळवली आहेत. मतमोजणी सुरुच राहणार असली तरी लाड यांचा विजय पक्का झाला आहे. नागपूर पदवीधर […]

Rekha Jare
महाराष्ट्र

रेखा जरे हत्याकांडात संपादकाच्या समावेशाने खळबळ…

अहमदनगर : रेखा जरे हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. या हत्यांकांडामागील मुख्य सूत्रधार संपादक बाळासाहेब बोठे असून त्याने सुपारी देऊन हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.  अहमदनगरसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी त्यांनी या प्रकरणाच्या तपासातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील कारवाईचे तपशीलही दिले. पोलिसांनी […]

Bollywood drugs case: Suspension of two NCB officials
मनोरंजन महाराष्ट्र

बॉलिवूड ड्रुग्स प्रकरण : NCB च्या दोन अधिकाऱ्यांचं ‘या’ कारणामुळे निलंबन

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) दोन अधिकाऱ्यांना त्यांच्या कामातील संशयास्पद भूमिकेसाठी निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश विभागीय संचालकांनी दिले आहेत. या अधिकाऱ्यांपैकी एकाचे दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या प्रकरणात सिक्युर बेलसाठी आणि दुसऱ्या अधिकाऱ्याचे कॉमेडियन भारती सिंगच्या प्रकरणात संशयास्पद भूमिकेसाठी निलंबन करण्यात आलं आहे. एनसीबीच्या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले […]

Chinese spacecraft lands on the moon
ग्लोबल

चीनचे अवकाशयान चंद्रावर दाखल, चीनच्या सरकारने दिली माहिती

चीनचे अवकाशयान चंद्रावर दाखल झाले आहे. चीनच्या सरकारने ही माहिती दिली. ‘चांगए ५’ हे अवकाशयान त्याच्या निर्धारित जागेवर मंगळवारी रात्री ११ वाजता यशस्वीरित्या उतरले, असे चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाने सांगितले. छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली असून, त्यांमध्ये हे अवकाशयान जिथे उतरले, तिथली जमीन दिसत आहे. हेनानच्या दक्षिणी बेटावरून २४ नोव्हेंबरला हे अवकाशयान सोडण्यात आले होते. ते […]

Corona vaccine may receive emergency approval in early January
कोरोना देश

मोठी बातमी : डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मिळू शकते मान्यता

भारतीयांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे कि, भारतात डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल. देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. यांपैकी दोन लशींची शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. डॉ. गुलेरिया म्हणाले, “भारतात अनेक लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. […]

Prakash Singh Badal returned the Padma Vibhushan
देश

प्रकाशसिंह बादल यांनी केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध करत ‘पद्मविभूषण’ सन्मान केला परत

केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात देशात शेतकऱ्यांचे आंदोलन आता अधिक उग्र स्वरुप धारण करत आहे. या दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ आपला ‘पद्मविभूषण’ सन्मान परत केला आहे. बादल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तीनपानी पत्र लिहून केंद्रीय कृषी कायद्यांचा निषेध केला आणि शेतकऱ्यांवर करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त करत पद्मविभूषण […]