Offensive work in the spa center

स्पा सेंटरमध्ये सुरु होते आक्षेपार्ह काम, गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोठी कारवाई

देश

भोपाळ : भोपाळमधील कोलार येथील स्पा सेंटरवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली. येथे स्पा सेंटरच्या आडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सेंटरमधून स्पा सेंटरचा मॅनेजर आणि तीन महिलांसह पाच जणांना अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरमध्ये तीन महिला आणि पुरूष आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. तसेच सेंटरमध्ये अनेक आक्षेपार्ह वस्तूही आढळून आल्या. स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली देहव्यापार सुरू होता. येणाऱ्या ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल केली जात होती. ग्राहकांशी मेसेज आणि फोनवरून संपर्क साधून स्पा सेंटरमध्ये बोलावले जायचे.

पोलिस अटक केलेल्या आरोपींची चौकशी करत आहेत. स्पा सेंटरमधून ताब्यात घेतलेल्या महिला परराज्यातील असल्याचे सांगण्यात येते. त्यांना मागणीनुसार स्पा सेंटरमध्ये बोलावले जात होते. महिला कानपूर आणि नेपाळच्या राहणाऱ्या आहेत. तर एक जण भोपाळमधील बैरागढचा रहिवासी आहे. कोलारच्या एका प्लाझामध्ये हे स्पा सेंटर आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी बोगस ग्राहक पाठवून ही कारवाई केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत