decide to start a local for all

मुंबई लोकल संदर्भात मोठा निर्णय, लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी

महाराष्ट्र मुंबई

लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते. बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

“येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात करोना स्थितीचा आढावा घेऊन लोकल प्रवासाबाबत निर्णय घेण्यात येईल”, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. यापूर्वीच मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितले होते की, “15 डिसेंबरला जर मुंबईत कोरोनाची स्थिती बिघडलेली नसेल. आकडे सकारात्मक कल दर्शवत असतील, तर 15 डिसेंबर नंतरच सर्वांसाठी लोकल सुरु करता येणे शक्य आहे.”

लोकल सुरु झाल्यानंतर मास्क वापरणं बंधनकारक असेल. सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता परतू लागले आहेत. परिणामी सध्या नियंत्रणात असलेला करोना पुन्हा वाढू नये. यासाठी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. तसेच दिवाळीच्या दिवसांत अनेक नागरिकांनी प्रवास केला आहे. तसेच दिवाळीसाठी गेलेले मुंबईकर आता पुन्हा मुंबईत परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचे या आठवड्यातील आकडे कसे असतील? कोरोनाची स्थिती कशी असेल? यावर मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय अवलंबून असेल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत