Important instructions issued by WHO regarding the use of face masks
कोरोना ग्लोबल

WHO ने फेस मास्कच्या वापराबाबत जारी केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

जागतिक आरोग्य संघटनने बुधवारी फेस मास्कच्या वापराबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. WHO ने सल्ला दिला आहे की, ज्या भागांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथल्या आरोग्य केंद्रांवर प्रत्येक व्यक्तीने फेस मास्क घालणं बंधनकारक आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

WHO च्या वतीने बुधवारी जारी करण्यात आलेल्या शिफारस पत्रात देण्यात आलेल्या सूचना :

  1. ज्या भागांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे, तिथे 12 वर्ष किंवा त्याहून जास्त वयाचे विद्यार्थी आणि मुलांसह सर्वांनी फेस मास्कचा वापर करावा.
  2. अशी ठिकाणं जिथे एअर एक्झॉस्टची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आलेली नाही, त्या ठिकाणी घरांमध्येही पाहुणे आल्यानंतर फेस मास्कचा वापर करण्यात यावा.
  3. एअर एक्झॉस्टची व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी गर्दी असेल तर फेस मास्क वापरावा.
  4. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितंल की, फेस मास्क व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सुरक्षित आहे. तसेच त्याचसोबत इतर सुरक्षात्मक उपाय जसं हात स्वच्छ ठेवण्यावरही लक्ष देणं गरजेचं आहे.
  5. हेल्थ केअर वर्कर्स, जे कोरोना रुग्णांची काळजी घेतात, त्यांनी N95 मास्कचा वापर करावा.
  6. WHO ने सल्ला दिला आहे की, शारीरिक परिश्रमाची कामं करताना लोकांनी मास्क वापरू नये. त्यामुळे अस्थमा किंवा श्वासाशी संबंधित आजार होण्याचा धोका संभवतो.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत