girlfriend put feviquick on her boyfriend wifes eyes in nalanda
देश

बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर प्रेयसीने रागाच्या भरात केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

बिहार : नालंदामध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर रागाच्या भरात त्याच्या प्रेयसीने त्याच्या पत्नीचे केस कापले आणि तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. नातेवाईकांनी तिला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील भागनबिगहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बॉयफ्रेंडचे लग्न झाल्यानंतर राग अनावर झालेली त्याची गर्लफ्रेंड मंगळवारी रात्री त्यांच्या घरात घुसली. तिने घरात झोपलेल्या नव्या नवरीचे केस कापले. त्यानंतर तिच्या डोळ्यांत फेविक्विक टाकले. पीडितीने आरडाओरड केल्यानंतर तिचा आवाज ऐकून नातेवाईक धावून आले. त्यांनी आरोपी तरुणीला पकडले आणि बेदम चोप दिला. त्यानंतर तिला पोलिसांच्या हवाली केले.

या अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या नवविवाहितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. नवरदेवाच्या नातेवाईकांनी सांगितले की, नवरी रात्री खोलीत झोपली होती. मध्यरात्री संबंधित तरूणी तिच्या खोलीत शिरली. आरडाओरड ऐकून आम्ही गेलो. नवविवाहितेची अवस्था पाहून आम्हाला धक्का बसला. दरम्यान, पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणीला पकडून नातेवाईकांनी चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत