मुंबई : दूरदर्शनवर प्रसारित झालेल्या रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. रामायण मालिकेमध्ये राजा दशरथ यांचे महामंत्री सुमंत यांची भूमिका साकारणारे कलाकार चंद्रशेखर वैद्य यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. Legendary Artist ChandraShekhar […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
रोनाल्डोने पाजलं पाणी! ‘कोका कोला’च्या बाटल्या बाजूला केल्याने कंपनीला २९ हजार ३५२ कोटींचं नुकसान
पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने पत्रकार परिषदेदरम्यान कोका कोलाच्या बाटल्या बाजूला केल्याने ब्रँडला मोठा फटका बसला आहे. युरो कप २०२२ स्पर्धेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान रोनाल्डोने कोका कोलाच्या बाटल्या बाजूला सरकावल्या, त्यामुळे कंपनीला तब्बल चार बिलियन डॉलर्स (जवळपास २९ हजार ३५२ कोटींचे) नुकसान झाले आहे. रोनाल्डो यूरो कप २०२० स्पर्धेत ‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ओळख असलेल्या […]
पाकिस्तानच्या संसदेमध्ये जोरदार राडा, सत्ताधारी-विरोधकांमध्ये हाणामारी आणि शिविगाळ
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदेमध्ये मंगळवारी (१5 जून) जोरदार राडा झाला. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआय आमि विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांना फाइली फेकून मारल्या तसेच शिवीगाळ केला. संसदेत सुरु असलेल्या या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा रक्षकांना सभागृहात बोलवावे लागले. वृत्तानुसार, मंगळवारी फेडरल बजेट २०२२-२२ च्या सर्वसाधारण चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी बोलण्याचा […]
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याला समर्थन दिलंच नव्हतं, वैज्ञानिकांचा धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून १३ मे रोजी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करत १२ ते १६ आठवडे निश्चित करण्यात आलं होतं. हा निर्णय वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशींनुसार घेतल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता यासंदर्भात तज्ज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवून दुप्पट करण्याला आमचा पाठिंबा नव्हता, असा खुलासा तज्ज्ञ गटातल्या […]
मुंबई पोलीस आयुक्तांनी जारी केला आदेश, जखमी व्यक्ती तक्रार दाखल करण्यासाठी आल्यास…
मुंबई : पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश जारी केला आहे. त्यानुसार, जखमी अवस्थेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्यांविषयी संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा असे सांगितले आहे. आयुक्तांनी सर्व पोलिसांना निर्देश दिले आहेत की, जखमी व्यक्तीकडे प्रथम वैद्यकीय अहवाल (medical report) न मागता त्यांना लवकरात लवकर उपचार कसा मिळेल याला प्राधान्य द्यावे. […]
पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेले ‘ते’ मृतदेह आई आणि मुलाचे, पण…
पुणे : सासवडमध्ये काल (15 जून) सकाळी एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर रात्री एका सहा ते आठ वर्षाच्या मुलाचा मृतदेह कात्रज बोगद्याजवळ आढळून आला. हे दोन मृतदेह आई आणि मुलाचे असल्याचे उघड झाले आहे. मृत महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचे नाव अयान शेख आहे. परंतु, आलिया यांचे पती आबीद शेख […]
खळबळजनक! पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ आढळला ६ वर्षीय मुलाचा मृतदेह
पुणे : नवीन कात्रज बोगद्याजवळील जांभुळवाडी गावच्या हद्दीत एका सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी संध्याकाळी हा मृतदेह आढळून आला. या मुलाचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव आयान शेख (वय 6) असे आहे. जांभुळवाडी […]
भारतात कोरोना लसीमुळे पहिला मृत्यू, सरकारी समितीने दिला दुजोरा
नवी दिल्ली : भारतात कोरोना लसीमुळे 68 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. सरकारने गठीत केलेल्या समितीने या वृत्तास दुजोरा दिला आहे. वृत्तानुसार, एका 68 वर्षीय व्यक्तीला 8 मार्च रोजी कोरोना लसीचा डोस देण्यात आला होता, त्यानंतर त्याला अॅनाफिलेक्सिससारखे दुष्परिणाम दिसून आले. त्यानंतर या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ही एक प्रकारची ऍलर्जिक रिऍक्शन आहे. लस […]
लग्नाच्या पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान झाले असे काही… नववधूचा मृत्यू
ब्राझील : लग्नानंतर वधू-वरांच्या आयुष्यातील पहिली रात्र खूप महत्वाची मानली जाते. लग्नानंतर दोघेही आपल्या सुखी संसाराची स्वप्न पाहत असतात. परंतु ब्राझीलमध्ये एका नवविवाहित जोडप्याच्या बाबतीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. लग्न झाल्यानंतर संसार सुरू होण्यापूर्वीच या नववधूचा मृत्यू झाला. लग्नाच्या पहिल्याच रात्री सेक्स दरम्यान ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलच्या इबीराइट शहरात ही घटना घडली […]
दुर्दैवी! मासे पकडण्यासाठी चिमुकले बहिण-भाऊ नाल्यात उतरले आणि अनर्थ घडला…
नागपूर : बहिण-भावाचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी सकाळी हिंगण्यातील आमगाव देवळी येथे ही घटना घडली आहे. आरुषी विलास राऊत (वय १०) आणि अभिषेक विलास राऊत (वय ७) अशी मृत चिमुकल्यांनी नावे आहेत. हे दोघे मासे पकडण्यासाठी नाल्यात उतरले असता ही दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या मृत भावंडांच्या आई-वडिलांचा मासेमारी हा […]










