नवी दिल्ली : एका 62 वर्षीय महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. पूर्व दिल्लीच्या नवीन अशोक नगरात रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने बलात्कार केल्यानंतर या वृद्ध महिलेचा गळा विळ्याने चिरला, नंतर तिच्यावर 25 पेक्षा जास्त वेळा वार करून तिची क्रूरपणे हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय आरोपीला अटक […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
चिंताजनक! शिर्डीत पाच महिन्यांच्या चिमुकलीला म्युकरमायकोसिस
अहमदनगर : शिर्डीत पाच महिन्यांच्या चिमुकलीला कोरोना होऊन गेल्यानंतर आता म्युकरमायकोसिसची बाधा झाली आहे. तिच्यावर लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट (PMT) रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. इतक्या लहान मुलीला म्युकरमायकोसिस झाल्याने चिंतेत भर पडली आहे. कोपरगाव तालुक्यातील कोरके कुटुंब शिर्डीत राहते. त्यांची परिस्थिती सामान्य आहे. त्यांना दोन मुली असून धाकटी मुलगी पाच महिन्यांची आहे. […]
बाबो! दोनदा मृत्यूला हरवलं.. व्हेलने मच्छिमाराला जिवंत गिळलं आणि मग…
अमेरिका : अमेरिकेत एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. येथे एक मच्छीमार एका विशालकाय व्हेल माशाच्या तोंडात गेला होता, परंतु त्यानंतर तो जिवंत बाहेर आला. या मच्छिमाराचे नाव मायकल पॅकार्ड असून तो ५६ वर्षांचा आहे. या संपूर्ण घटनेबद्दल त्याने स्वत: च सांगितले आहे. वृत्तानुसार, मायकल पॅकार्ड सुमारे 30 सेकंद व्हेल माशामध्येच राहिले, परंतु तरीदेखील ते बचावले. […]
माणुसकीला काळिमा! शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
नागपूर : नागपुरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. काटोल तहसीलमधील एका गावात एका 25 वर्षीय तरूणाने शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ वर्षांची मुलगी गावातील शाळेच्या मैदानात खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला बघितले आणि तिला उचलून शौचालयात नेले. या आरोपीने त्या ठिकाणी […]
मोठी बातमी : ताजमहालसह सर्व एएसआय संरक्षित स्मारके आणि संग्रहालये 16 जूनपासून उघडणार,
नवी दिल्ली : कोरोना संसर्गामुळे ताजमहालसह सर्व एएसआय संरक्षित केंद्रीय स्मारके आणि संग्रहालये बंद आहेत. आता ही एएसआय अंतर्गत सर्व संरक्षित स्मारके आणि संग्रहालये 16 जूनपासून उघडली जाणार आहेत. कोविडमुळे ही ठिकाणे 16 एप्रिलपासून बंद आहेत. देशभरात कोरोना संक्रमणाच्या दुसर्या लाटेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व केंद्रीय स्मारके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला […]
अभिनेता विजय संचारी यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला अवयवदानाचा निर्णय
बेंगळुरू : राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं सोमवारी (१४ जून) निधन झालं. ते ३८ वर्षांचे होते. बेंगळुरूमध्ये शनिवारी रात्री त्यांच्या बाईकचा अपघात झाला होता. या अपघातात विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ते कोमात होते. मेंदूवर आपत्कालीन शस्त्रक्रिया करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा […]
रक्तदान केल्याने शरीराला होणारे ‘हे’ जबरदस्त फायदे माहित आहेत का? जाणून घ्या…
World Blood Donar day २०२१ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे आपण नेहमी ऐकतो. रक्तदान करून आपण अनेक जणांचे प्राण वाचवू शकतो. लोकांमध्ये रक्तदान करण्याबद्दल जागरूकता यावी, या उद्देशाने दरवर्षी 14 जूनला जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. रक्तदानाबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात, ज्यामुळे आपल्या देशात रक्ताची असलेली गरज भागत नाही. पण आपल्याला रक्तदान […]
मस्तच! Google Pixel 4a स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, ५ हजार रुपयांची मोठी सूट
नवी दिल्ली : Google Pixel 4a स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला होता. त्यावेळी Google Pixel 4a च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये होती. मात्र, आता आपण हा स्मार्टफोन ५ हजार रुपये सूटसह २६,९९९ रुपयात खरेदी करू शकणार आहात. Google pixel 4a […]
मुंबईतील एसटी बसेसची सेवा आजपासून बंद, सर्वसामान्यांचे हाल
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या. याचा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी बेस्ट व्यतिरिक्त एसटी महामंडळाच्या काही गाड्याही मुंबईत धावत होत्या. पण ही सेवा आजपासून (14 जून) थांबविण्यात आली आहे. मात्र, लोकल अद्याप सुरु झालेली नसल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत. परिवहन मंत्री […]
लहान मुलांसाठी प्रतिकारशक्तीच ठरेल संरक्षक, त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास ‘या’ गोष्टी करतील मदत
लहान मुलांमध्येही आता कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. हे लक्षात घेता, आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत, जेणेकरुन मुलांना कोरोनाच्या तिसर्या लाटेपासून वाचवता येईल. परंतु, केवळ इतकेच पुरेसे ठरणार नाही. या कठीण काळामध्ये मुलांची योग्य ती काळजी घेण्याबाबत पालकांची मोठी जबाबदारी आहे, जेणेकरुन त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील. ज्यामध्ये पौष्टिक आहार मोठी भूमिका बजावतो. चला तर […]










