Kannada actor Sanchari Vijay dies his family to donate his organs

अभिनेता विजय संचारी यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

मनोरंजन

बेंगळुरू : राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजय यांचं सोमवारी (१४ जून) निधन झालं. ते ३८ वर्षांचे होते. बेंगळुरूमध्ये शनिवारी रात्री त्यांच्या बाईकचा अपघात झाला होता. या अपघातात विजय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि ते कोमात होते. मेंदूवर आपत्कालीन शस्त्रक्रिया करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिनेता सुदिपने ट्विट करत म्हटले कि, “संचारी विजयचा मृत्यू झाला हे खूपच दुःखद आणि निराशाजनक आहे. या लॉकडाउनपूर्वी त्याला फक्त दोनदाच भेटलो. त्याच्या पुढील चित्रपटाबद्दल उत्सुक होता, जो रिलीज होणार आहे. मी अतिशय दु:खी आहे. त्याच्या कुटूंबाच्या आणि मित्रांच्या दुःखात सहभागी आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो.”

विजय शनिवारी रात्री आपला मित्र नवीन याच्यासह दुचाकीवर जात होता, त्यावेळी त्यांची बाईक विजेच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात नवीनचा पाय फ्रॅक्चर झाला, पण विजय यांना गंभीर दुखापत झाली. शनिवारी रात्री 11:45 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ते दुचाकीवर औषधे घेण्यासाठी बाहेर गेले होते. याप्रकरणी नवीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय कर्नाटकातील थिएटर सर्कलमधील एक सुप्रसिद्ध अभिनेता होता. तो त्याच्या नानू अवनाल्ला … अवलू, किलिंग वीरप्पन आणि नाथीचरामी अशा चित्रपटांसाठी ओळखला जातो.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत