seven year old girl was allegedly raped by a man in the toilet of a school

माणुसकीला काळिमा! शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

नागपूर महाराष्ट्र

नागपूर : नागपुरात माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. काटोल तहसीलमधील एका गावात एका 25 वर्षीय तरूणाने शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ वर्षांची मुलगी गावातील शाळेच्या मैदानात खेळत होती. त्यावेळी आरोपीने तिला बघितले आणि तिला उचलून शौचालयात नेले. या आरोपीने त्या ठिकाणी या चिमुकलीवर बलात्कार केला, त्यानंतर तिला धमकी दिली की याबद्दल कुणालाही काही सांगितले तर ठार मारेल. दरम्यान, मुलगी घाबरून ओरडू लागली. वाटेवरून जाणाऱ्या एका व्यक्तीने मुलीचे ओरडणे ऐकले. ती व्यक्ती धावत मुलीला वाचवण्यासाठी गेली, तेव्हा आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. आरोपीची ओळख पटली असून तो त्याच गावचा रहिवासी आहे. याप्रकरणी पोलिसांनी अंकुश भास्कर नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, घटना उघडकीस आल्यानंतर…

आरोपीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीविरूद्ध भारतीय दंड संहिता आणि मुलांच्या लैंगिक अपराधांविषयी संरक्षण कायदा पॉक्सोच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर भादंवि कलम 376 (अ) (ब) आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. काटोल पोलिस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत