62 year old woman raped stabbed 25 times by man

वृद्ध महिलेवर बलात्कार.. विळ्याने 25 पेक्षा जास्त वार करून निर्घृण हत्या

क्राईम देश

नवी दिल्ली : एका 62 वर्षीय महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आली. पूर्व दिल्लीच्या नवीन अशोक नगरात रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने बलात्कार केल्यानंतर या वृद्ध महिलेचा गळा विळ्याने चिरला, नंतर तिच्यावर 25 पेक्षा जास्त वेळा वार करून तिची क्रूरपणे हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिच्या शेजारी राहणाऱ्या 30 वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, ही वृद्ध महिला भाजी विकण्याचे काम करत होती. तिचा धाकटा मुलगा एका बँकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. तिचा मुलगा घरी परतला तेव्हा, त्याने आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले बघितले, तेव्हा हा गुन्हा उघडकीस आला. त्याने महिलेला तातडीने धर्मशिला रुग्णालयात दाखल केले, परंतु, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले.

माणुसकीला काळिमा! शाळेतील शौचालयात ७ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार

दरम्यान, रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची एक टीम रुग्णालयात दाखल झाली. त्यांनी महिलेच्या मुलाचा जबाब नोंदवला. त्याने सांगितले की त्याची आई दल्लुपुरा गावात त्यांच्या घराजवळ भाजीपाला विकते. रविवारी दुपारी ती जेवण बनवण्यासाठी घरी गेली होती, तेव्हा कुणीतरी तिच्यावर हल्ला केला.

प्राथमिक वैद्यकीय तपासणीत या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी गुन्हेगारी पथक व फॉरेन्सिक पथक पाठविण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक संशयित आरोपी घरात प्रवेश करताना दिसला. त्यानंतर काही वेळाने तो बाहेर जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी ओळख पटवून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. आरोपीने गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडून हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे.

बाबो! दोनदा मृत्यूला हरवलं.. व्हेलने मच्छिमाराला जिवंत गिळलं आणि मग…

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत