ST employees salary and bonus before Diwali - Transport Minister Anil Parab

मुंबईतील एसटी बसेसची सेवा आजपासून बंद, सर्वसामान्यांचे हाल

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे उपनगरीय लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या. याचा सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होऊ नये यासाठी बेस्ट व्यतिरिक्त एसटी महामंडळाच्या काही गाड्याही मुंबईत धावत होत्या. पण ही सेवा आजपासून (14 जून) थांबविण्यात आली आहे. मात्र, लोकल अद्याप सुरु झालेली नसल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अनिल परब म्हणाले कि, “लॉकडाऊनमुळे लोकल गाड्या सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे सार्वजनिक वाहतुकीवर होऊ नये यासाठी मुंबईत बेस्टसह एसटी बसेसही धावत होत्या. पण सोमवारपासून ही सेवा बंद करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महामंडळाचे कर्मचारी सेवा देत होते. परगावातून येऊन मुंबईला सेवा देणाऱ्या सर्व ड्रायव्हर, वाहक आणि कर्मचारी अधिकारी यांचे आभार. तुमच्या सेवेमुळे एस. टी. चा सन्मान आणि विश्वास आजही टिकून आहे.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत