पुणे : नवीन कोविड निर्बंधांनंतर राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपर्यंत असलेल्या जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, निर्बंध शिथील होताच काही भागांत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंधांचे संकेत दिले आहेत. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुण्यात माहिती दिली. विजय वडेट्टीवार म्हणजे कि, “कालची आकडेवारी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
अखेर अचानक बुडालेली ‘ती’ कार बाहेर काढण्यात यश
मुंबई : इमारतीमधील पार्किंगमध्ये उभी केलेली कार काही क्षणात बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. विहिरीत बुडालेली ही कार अखेर १२ तासांनी बाहेर काढण्यात आली आहे. रविवारी सकाळी घाटकोपर येथील एका इमारतीतील पार्किंगमध्ये खड्डा तयार होऊन कार बुडाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या परिसरात एक विहीर होती. विहिरीच्या अर्ध्या भागावर आरसीसी करुन ती […]
भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 9 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी
नागपूर : नागपूरमधील कटोल रोडवर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर नऊ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी शनिवारी यासंबंधी माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पंचनामा करून पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी ते मृतदेह […]
फाफ डू प्लेसिस सामन्यादरम्यान जखमी, सहकारी हसनेनशी जोरदार धडक, रुग्णालयात दाखल..
अबू धाबी : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटर फाफ डू प्लेसिस शनिवारी अबू धाबी येथे PSL 6 सामन्यादरम्यान जखमी झाला आहे. डू प्लेसिसची सहकारी मोहम्मद हसनेन याच्याशी जोरदार टक्कर झाली. त्यामुळे फाफ डू प्लेसिसला चांगलाच मार बसला. पेशावर झल्मीविरुद्धच्या सामन्यात सातव्या षटकात ही घटना घडली. फाफ डू प्लेसिसने चौकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, यावेळी दुसऱ्या बाजूने […]
हवामान खात्याकडून राज्यात ऑरेंज अलर्ट जारी, आज अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
मुंबई : मुंबईत मान्सून दाखल झाला असून आठवडाभरापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम आहे. हवामान खात्याने राज्यात ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापुर, सातारा व घाटमाथ्यासह संपूर्ण महाराष्ट्र ऑरेंज […]
फुटबॉलपटू एरिक्सन सामन्यादरम्यान मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला, रुग्णालयात दाखल
कोपनहेगन : युरो कप २०२० स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डेन्मार्क वि. फिनलंड या दोन संघांमध्ये मॅच सुरू होती. या मॅचदरम्यान डेन्मार्कचा दिग्गज मिडफिल्डर ख्रिस्टियन एरिक्सन अचानक मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला. पहिल्या हाफमधील खेळ संपन्याच्या अगोदर ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, एरिक्सनची प्रकृती सध्या स्थिर आहे. एरिक्सन बेशुद्ध झाल्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय सुविधा दिली गेली. त्याला मैदानावरच […]
बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनला गैरवर्तनाची शिक्षा, पुढील चार सामन्यांसाठी बंदी
नवी दिल्ली : बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनला मैदानावरील गैरवर्तनाबद्दल व पंचांशी भांडण केल्याबद्दल शिक्षा झाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) त्याच्यावर ढाका प्रीमियर लीगच्या पुढील चार सामन्यांसाठी बंदी घातली होती. यासंदर्भात मंडळाने अद्याप अधिकृत निवेदन दिलेले नाही. मोहम्मदान स्पोर्टिंग क्लब क्रिकेट समितीचे अध्यक्ष मसूदुझमान यांनी शनिवारी क्रिकबझला सांगितले की, “आम्हाला अद्याप कोणतेही अधिकृत […]
भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, घटना उघडकीस आल्यानंतर…
पंजाब : पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे तंत्र मंत्राच्या नावावर एका भोंदू बाबाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पीडित मुलीच्या कुटूंबियांनी भोंदू बाबाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पठाणकोटच्या भदरोया येथील आहे, येथे एक भोंदू बाबा तंत्र मंत्र करीत […]
Pune : दारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची हत्या, बहिणीला दिली धमकी, आणि…
पुणे : दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या आजारी वडिलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने वडिलांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून 36 तास घरात लपवून ठेवला. पुण्याच्या उरली कांचन भागातील टीपू वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचा आपल्या वडिलांशी दारू पिण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर त्याने वडिलांची हत्या केली. नईम रहीम शेख (वय 35) […]
पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला, दोन पोलिस शहीद, २ नागरिकांचा मृत्यू
काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे दहशतवाद्यांनी पोलिस आणि सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. दहशतवादी हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर २ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी पळून गेले. हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराला घेराव घालून व्यापक शोध मोहीम राबविली जात आहे. याआधी शुक्रवारी शोपियांमधील लिटर अग्लर भागात […]










