Center issues new guidelines on corona

तर ८ दिवसांत राज्यात पुन्हा कठोर निर्बंध, राज्य सरकारने दिले संकेत

महाराष्ट्र

पुणे : नवीन कोविड निर्बंधांनंतर राज्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपर्यंत असलेल्या जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, निर्बंध शिथील होताच काही भागांत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर निर्बंधांचे संकेत दिले आहेत. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पुण्यात माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

विजय वडेट्टीवार म्हणजे कि, “कालची आकडेवारी पाहता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी आणि नवीन रुग्णांची संख्या अधिक होती. तरीही आजच यावर भाष्य करता येणार नाही. पुढचे आठ दिवस या परिस्थितीत काय बदल होतात ते पाहावे लागेल. सध्या काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसत आहे. आपण सवलती व काही प्रमाणात सूट दिल्यानंतर हा बदल झाला आहे. अशीच रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र एकंदर स्थितीचा आढावा घेऊन अनेक निर्बंध नव्याने लावावे लागतील.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत