an accident
नागपूर महाराष्ट्र

भरधाव ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, 9 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

नागपूर : नागपूरमधील कटोल रोडवर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर नऊ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी शनिवारी यासंबंधी माहिती दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर पंचनामा करून पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी ते मृतदेह शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवले. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतनामसिंग अंधरेले (वय 50) आणि मुन्नी कौर अंधरेले (वय 45) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तिघे बाईकवरून परसोडी या गावी जात असताना ही घटना घडली. या अपघातात सतनाम सिंगचा पुतण्या सुलिदर सिंग गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत