कोपनहेगन : युरो कप २०२० स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डेन्मार्क वि. फिनलंड या दोन संघांमध्ये मॅच सुरू होती. या मॅचदरम्यान डेन्मार्कचा दिग्गज मिडफिल्डर ख्रिस्टियन एरिक्सन अचानक मैदानावर बेशुद्ध होऊन कोसळला. पहिल्या हाफमधील खेळ संपन्याच्या अगोदर ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, एरिक्सनची प्रकृती सध्या स्थिर आहे.
एरिक्सन बेशुद्ध झाल्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय सुविधा दिली गेली. त्याला मैदानावरच सीपीआर दिला गेला आणि उपचार करण्यात आले. त्यानंतर एरिक्सला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर सामना तातडीने स्थगित करण्यात आला.
Following the medical emergency involving Denmark’s player Christian Eriksen, a crisis meeting has taken place with both teams and match officials and further information will be communicated at 19:45 CET.
The player has been transferred to the hospital and has been stabilised.
— UEFA EURO 2020 (@EURO2020) June 12, 2021
या सामन्यात १५ हजार चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. एरिक्सन अचानक मैदानावर कोसळल्यानंतर संपूर्ण मैदानात शांतता पसरली. या घटनेनंतर त्याचे सहकारी खेळाडू आणि चाहते रडू लागले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे UEFA ने सामना निलंबित केला होता. परंतु, दोन्ही संघांच्या खेळाडूंनी विनंती केल्यानंतर २ तासाने सामना पुन्हा सुरू झाला. हा सामना कोपनहेगनच्या पार्केन स्टेडियममध्ये झाला. अखेर सामन्यात फिनलँडने डेन्मार्कचा 1-0 असा पराभव केला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
43 व्या मिनिटाला डेन्मार्कला थ्रो मिळाला. त्यावेळी स्कोअर 0-0 होता. डॅनिश खेळाडूने बॉल एरिक्सनकडे थ्रो केला. बॉल घेताना एरिक्सन अचानक बेशुद्ध झाला. यानंतर तात्काळ मेडिकल टीमला बोलावण्यात आले. त्याला मैदानावर सीपीआर देण्यात आला. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॅनिश फुटबॉल फेडरेशनने म्हटले आहे की एरिकसन ठीक आहे.
That moment when the whole Denmark team circled eriksen, whilst he was clearly receiving treatment – all in aid to block the media / cameras was one of the most incredible sporting moments I’ve ever seen.
So good to hear he’s now in a stable condition. ❤️
— Brandon Smith (@BSmith_Esports) June 12, 2021
त्यानंतर सामना भारतीय वेळेनुसार 12 वाजता पुन्हा सुरू करण्यात आला. यावेळी एरिक्सनचा पर्याय म्हणून मॅथियस जेन्सनला मैदानात पाठविण्यात आले. मात्र, सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर डॅनिश संघ एरिक्सन प्रकरणातून सावरला नव्हता, त्यामुळे डेन्मार्कचा संघ पराभूत झाला.
बांगलादेशचा स्टार क्रिकेटर शाकिब अल हसनला गैरवर्तनाची शिक्षा, पुढील चार सामन्यांसाठी बंदी




