IPL 2020: Today's final match between Mumbai Indians and Delhi Capitals
क्रीडा

IPL 2020 Final, MI vs DC Live Updates : मुंबई विरुद्ध दिल्ली मॅच अपडेट्स; मुंबईचा दिल्लीवर 6 विकेट्सने शानदार विजय

दुबई : IPL 2020 Final Live Score MI vs DC आयपीएलचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फायनल मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळली जात आहे. या सामन्यात जिंकून मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. तर दिल्लीचा पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार) कायरन पोलार्ड, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पेटिन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कृणाल पांड्या, मिचेल मॅक्लेनघन, मोहसिन खान, नॅथन कूल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेन्ट बोल्ट.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, अक्षर पटेल, संदीप लमिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, एनरिक नोर्तजे, अॅलेक्स कॅरी, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टोयनिस आणि ललित यादव.

मुंबईच्या इशान किशनने दुखापतीमुळे मैदान सोडले
मुंबई इंडियन्सच्या इशान किशनला सहाव्या षटकात दुखापत झाली. सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर इशानने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरचा झेल सोडला. त्यावेळी इशानला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले.

मुंबईने पहिल्याच चेंडूवर दिला दिल्लीला धक्का

मुंबईचा दिल्लीला मोठा धक्का, अजिंक्य रहाणे

मुंबईचा दिल्लीला मोठा धक्का, शिखर धवन आऊट

रिषभ पंतने साकारले धडाकेबाज अर्धशतक

दिल्लीला मोठा धक्का, अर्धशतकवीर रिषभ पंत आऊट

श्रेयस अय्यर साकारले धडाकेबाज अर्धशतक

दिल्लीला मोठा धक्का,  शिमरॉन हेटमायर आऊट

दिल्लीला सहावा धक्का, अक्षर पटेल आऊट

दिल्लीचा सातवा धक्का, कगिसो रबाडा आऊट

अय्यर-पंत यांची दमदार अर्धशतके, दिल्लीचे मुंबईपुढे १५७ धावांचे आव्हान
कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 157 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक नाबाद 65 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 56 धावांची खेळी केली. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

मुंबईने रबाडाच्या पहिल्याच षटकात केली धुलाई
मुंबईच्या संघाने दिल्लीचा अव्वल गोलंदाज कागिसो रबाडाच्या पहिल्याच षटकात जोरदार फटकेबाजी केली. मुंबईने या षटकात तीन चौकार आणि एका षटकारासह १८ धावा वसूल केल्या.

मुंबईला पहिला धक्का, क्विंटन डी कॉक आऊट

मुंबईला दुसरा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट

रोहित शर्माचे धडाकेबाज अर्धशतक

मुंबईला मोठा धक्का; रोहित शर्मा आऊट

मुंबईला मोठा धक्का; कायरन पोलार्ड आऊट

मुंबईचा दिल्लीवर 6 विकेट्सने शानदार विजय

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत