alcohol addict son killed bedridden father slits his throat.
क्राईम पुणे महाराष्ट्र

Pune : दारूच्या नशेत मुलाने केली वडिलांची हत्या, बहिणीला दिली धमकी, आणि…

पुणे : दारूच्या आहारी गेलेल्या मुलाने आपल्या आजारी वडिलांचा गळा चिरून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने वडिलांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून 36 तास घरात लपवून ठेवला. पुण्याच्या उरली कांचन भागातील टीपू वस्ती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीचा आपल्या वडिलांशी दारू पिण्यावरून वाद झाला होता, त्यानंतर त्याने वडिलांची हत्या केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

नईम रहीम शेख (वय 35) असे आरोपीचे नाव आहे. नईम हा एक ऑटो मेकॅनिक आहे. आरोपी आपली लहान बहीण आणि वडिलांबरोबर राहत होता. गंभीर आजारामुळे वडील अंथरुणाला खिळून होते. आरोपीची पत्नी त्याच्याबरोबर राहत नव्हती.

नागपूर हादरले! बदला घेण्यासाठी 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या, काकाने केलं होतं गैरकृत्य…

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा आरोपी दारू पिऊन घरी परतला. त्यानंतर, त्याचे दारू पिण्यावरून वडिलांशी भांडण झाले. रागाच्या भरात त्याने आपल्या वडिलांचा गळा दाबला आणि नंतर धारदार शस्त्राने गळा चिरून त्यांची हत्या केली. त्याने वडिलांचा मृतदेह कपड्यात गुंडाळून घरातच लपवून ठेवला होता आणि त्याच्या बहिणीला याबद्दल कोणालाही काहीही सांगू नको, अशी धमकीही दिली होती.

आरोपीने गुरुवारी कुटुंबातील सदस्यांना सांगितले की त्याच्या वडिलांचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकताच आरोपीची पत्नी सासऱ्यांच्या अंत्यविधीसाठी आली. परंतु, तेथे आल्यानंतर तिला नणंदेने वडिलांच्या हत्येविषयी सांगितले, त्यानंतर तिने तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला. दरम्यान, पोलिसांना नईम शेख याने वडिलांची हत्या केल्याचे समजताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पर्ल पुरीने ‘त्या’ मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप खरा, पीडितेच्या वडिलांनी केला मोठा खुलासा

धक्कादायक! 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 आरोपी 10 ते 12 वयाचे, सोशल मीडियावर व्हिडिओ बघितल्यावर झाला खुलासा

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत