मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसींच्या खरेदीसाठी 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोफत लसी पुरवण्याची घोषणा केली. लसीकरणाचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यांवर असणारा भार कमी झाला आहे. त्यामुळे आता ते 7 हजार […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमधील शोरूममध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील लाजपत नगर मार्केटमधील एका कपड्यांच्या शोरूममध्ये भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास सेंट्रल मार्केटमधील केएफसीजवळ कपड्यांच्या शोरूममध्ये आग लागल्याची घटना घडली. भीषण आग पाहून आसपासच्या लोकांमध्ये […]
लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने संसर्ग होण्याची शक्यता वाढते – डॉ. अँथनी फाउची
नवी दिल्ली : अमेरिकेच्या अध्यक्षांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथनी फाउची यांनी इशारा दिला आहे की कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढविल्याने कोरोनाची बाधा होण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे त्यांनी दोन डोसमधील अंतर निश्चित असण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकारने गेल्या महिन्यांत दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांपर्यंत वाढविले आहे. यावर प्रतिक्रिया देताना फाउची म्हणाले कि, “मॉडर्नाच्या […]
पावसाच्या पाण्यातून चालता? लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता, जाणून घ्या लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार…
मुंबई : पावसाळा सुरु झाला आहे, अशा परिस्थितीत मुसळधार पावसात पाण्यातून योग्य खबरदारी न घेता चालणाऱ्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर BMC कडून आवाहन करण्यात आले आहे, की अशा व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) लेप्टोस्पायरोसिसबाबत सल्लागार जारी केला आहे. असा […]
मासिक पाळी येण्यास उशीर होतोय? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय…
प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. अशातच बर्याच वेळा महिलांना वेळ निघून गेल्यानंतरही मासिक पाळी येत नाही. अशा परिस्थितीत, महिला अस्वस्थ होतात. परंतु, अस्वस्थ होण्याऐवजी किंवा बाह्य औषध घेण्याऐवजी आपण काही सोपे घरगुती उपाय करून मासिक पाळी सहजपणे आणू शकता. अनेक वेळा मासिक पाळी लवकर येण्यासाठी महिला औषधे-गोळ्या घेतात. त्यामुळे मासिक पाळी तर येते, पण सोबतच […]
आणि तुम्ही म्हणता राज्यातील पोलिसांवर तुमचा विश्वास नाही; हे धक्कादायक, सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना सुनावले
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्या विरोधातील सर्व चौकशा महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र संस्थेकडे सोपवाव्यात, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत परमबीर सिंग यांना कठोर शब्दांत सुनावले आहे. माजी पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी आपल्याविरोधात करण्यात येणारी […]
पर्ल पुरीने ‘त्या’ मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप खरा, पीडितेच्या वडिलांनी केला मोठा खुलासा
मुंबई : अभिनेता पर्ल वी पुरी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी, आता पीडितेच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. पर्लची ओळख त्यांच्या मुलीनेच फोटो पाहून पटवल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यापूर्वी पीडितेच्या आईने पर्ल निर्दोष असल्याचं सांगत मुलीचा ताबा मिळवण्यासाठी पीडितेचे वडील खोटे आरोप करत […]
नागपूर हादरले! बदला घेण्यासाठी 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या, काकाने केलं होतं गैरकृत्य…
नागपूर : नागपूरमध्ये 15 वर्षीय मुलाचे अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत आऊटर रिंग रोड परिसरात काल रात्री उशिरा पोलिसांना त्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू पांडे असं हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचं नाव आहे. […]
कुलभूषण जाधव यांना दिलासा, शिक्षेविरोधात पाकिस्तानमधील वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची संधी
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेले भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावामुळे पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीने कुलभूषण जाधव यांना वरिष्ठ कोर्टात अपील करण्याची मंजुरी देणाऱ्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांना एका बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवून मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. कुलभूषण जाधव यांना या शिक्षेविरोधात […]
बँकांचे व्यवहार आता महाग होणार, दरांमध्ये वाढ करण्यास RBI ची मंजुरी
मुंबई : बँकांच्या एटीएममधून पैसे काढणं आता महाग होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा देखील समावेश आहे. दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याने आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले […]










