for irregular periods try this home remedies

मासिक पाळी येण्यास उशीर होतोय? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय…

तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. अशातच बर्‍याच वेळा महिलांना वेळ निघून गेल्यानंतरही मासिक पाळी येत नाही. अशा परिस्थितीत, महिला अस्वस्थ होतात. परंतु, अस्वस्थ होण्याऐवजी किंवा बाह्य औषध घेण्याऐवजी आपण काही सोपे घरगुती उपाय करून मासिक पाळी सहजपणे आणू शकता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अनेक वेळा मासिक पाळी लवकर येण्यासाठी महिला औषधे-गोळ्या घेतात. त्यामुळे मासिक पाळी तर येते, पण सोबतच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव, वेदना अशा अनेक समस्याही येतात. अशा परिस्थितीत अडचणींना सामोरे जाण्याऐवजी जर तुम्ही स्वयंपाकघरात उपस्थित असलेल्या काही गोष्टी नियमितपणे खाल्ल्या, तर तुमचे काम सोपे होईल.

  1. आलं :
    पीरियड येत नसल्यास आल्याचे सेवन सुरू करा. आल्यामुळे अनियमित पाळी वेळेवर येते. एक कप पाण्यात एक चमचा आले टाकून थोडावेळ उकळवा, त्यात थोडी साखर घाला आणि हे मिश्रण दिवसातून तीनदा थोडं-थोडं घ्या. आपणास हे मिश्रण घेण्यास काही अडचण येत असेल तर सकाळी गुळाबरोबर आले खाणेही फायदेशीर ठरेल. त्यामुळे मासिक पाळी येईल.
  2. धणे :
    स्त्रियांची मासिक पाळी येण्यास उशीर झालेला असल्यास धणे खूप उपयुक्त ठरतात. एक चमचा धणे दोन कप पाण्यात उकळा. हे पाणी एक कप शिल्लक राहील की गॅस बंद करा आणि चांगले गाळून घ्या. दिवसातून तीन वेळा हे पाणी प्या. जर आपण या पाण्याचे नियमाने सेवन केले तर मासिक पाळी आणण्यात ते खूप प्रभावी ठरेल. पूर्वीपासून स्त्रिया मासिक पाळी नियमित करण्यासाठी हा उपाय करतात.
  3. दालचिनी :
    जर आपली मासिक पाळी येण्यास उशीर झालेला असेल तर दालचिनीचे सेवन करा. दालचिनी आपल्या शरीरात सहजपणे उष्णता निर्माण करेल. एक ग्लास कोमट दुध घ्या आणि त्यात दालचिनी पावडर मिसळा. हा उपाय आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल आणि लवकरच मासिक पाळी येईल.
  4. ओवा आणि गुळ : ज्या स्त्रियांची मासिक पाळी येण्यास उशीर झालेला आहे, त्यांनी ओव्याबरोबर गूळ खावा. पाळी सुरू होण्याकरिता, एक ग्लास पाण्यात एक चमचा गूळ आणि एक चमचा ओवा उकळवा. मासिक पाळी येत नसेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असे केल्याने लवकरच मासिक पाळी येईल. तसेच यामुळे तुमच्या मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना देखील कमी होतील.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत