advantages and disadvantages of drinking jaggery tea

गुळाचा चहा पिण्याचे हे फायदे आणि तोटे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेऊया…

तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

पुणे :  साखरेच्या तुलनेत गुळाच्या चहामध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे गुळाचा चहा पिणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. थंडीच्या दिवसात गूळ खाणे चांगले असते असेही म्हटले जाते. तसेच गूळ खाण्याचे आणि गुळाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. चला तर मग, जाणून घेऊया…

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गुळाचा चहा पिण्याचे फायदे :

 1. सर्दी, पडसे, खोकल्यावर प्रभावी – सर्दी आणि खोकला झाल्यास आजही घरातील जुनी लोकं गुळ आणि हळद खाण्याचा सल्ला देतात. किंवा दुधामध्ये गुळ आणि हळद मिसळून पिण्याचा सल्ला देतात.
 2. मुरुमाची समस्या – जास्त तेलकट खाल्ल्याने, धुळीमुळे किंवा पित्ताचा त्रास असल्यास चेहऱ्यावर मुरूम येतात. मात्र रोज थोडा गूळ खाल्ल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते.
 3. ऍनिमिया – गुळात लोह खनिज जास्त असल्याने रोज सकाळी पाण्यासोबत याचे सेवन केल्यास ऍनिमियाचा त्रास कमी होतो.
 4. एनर्जी देण्याचे काम  –  थकवा जाणवत असल्यास किंवा ऊन लागल्यास गुळाच्या चहाचे सेवन केल्याने आराम मिळतो आणि शरीराला एनर्जी देण्याचे काम गूळ करतो.
 5. पचनक्रिया सुधारते  – दम्याचा त्रास असल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो. यामुळे शरीराचे तापमानही नियंत्रणात राहते आणि पचनक्रिया सुधारते.
 6. घशाला आराम –  घसा खवखवत असल्यास किंवा घसा बसल्यास गूळ खाल्ल्याने आराम मिळतो.
 7. हिमोग्लोबिन वाढते – रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरते.
 8. रक्त वाढते  – गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह आढळते. जर शरीरात रक्ताची कमतरता असेल, तर मग गुळाचा चहा तुमची ही समस्या दूर करेल.

गुळाचा चहा कोणी पिऊ नये..?

 1. डायबेटीसच्या रुग्णांनी गुळाचा चहा पिऊ नये. कारण गुळाचा चहा पिण्यामुळे ब्लड शुगर वाढू शकते. त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी गुळाचा व साखरेचा चहा पिणे टाळावे.
 2. आमवातचा त्रास असल्यास गुळाचा चहा पिणे टाळावे. कारण गुळात sucrose चे प्रमाण अधिक असल्याने आमवातात सांध्यातील सूज अधिक वाढू शकते.

गुळाच्या चहामुळे होणारे नुकसान  :

 1. दिवसभरात एक ते दोनवेळा चहा पिणे पुरेसे असते. मात्र दिवसभरात वरचेवर चहा पित राहिल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. याला गुळाचा चहाही अपवाद नाही.
 2. गुळाचा चहा अधिक पिण्यामुळे यातील कॅलरीजमुळे अधिक वजन वाढू शकते. वजन अधिक वाढण्यामुळे डायबेटीस, हृदयविकार होण्याचा धोकाही वाढू शकतो.
 3. गुळाच्या अती सेवनानं रक्तातील साखरेचं प्रमाणही वाढतं. 10 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 9.7 ग्रॅम इतकी साखर असते.
 4. 100 ग्रॅम गुळामध्ये जवळपास 385 कॅलरी असतात. त्यामुळं डाएट करणाऱ्यांनी याचं सेवन प्रमाणात करावं. पण, वजन वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी हे सेवन फायद्याचं ठरतं.
 5. गरम वातावरणात गुळाचे सेवन केल्यास अनेकदा नाकातून रक्त वाहण्यासही सुरुवात होते. पोटातील गरमी वाढल्यामुळं याचे विपरीत परिणाम त्वचेवरही दिसून येतात.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत