relief to punekars all shops and malls in pune will be open till 7 pm declares ajit pawar
पुणे महाराष्ट्र

पुणेकरांना मोठा दिलासा! कोरोना निर्बंध आणखी शिथिल, जाणून घ्या…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉल इथे कोरोना आढावा बैठक पार […]

Rules regarding Pandharpur's Ashadi Wari Palkhi announced
महाराष्ट्र

पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर, पायी वारी सोहळा नाही

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं. परंतु, पायी वारी सोहळ्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. अजित पवार म्हणाले की, “वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवरांसोबत […]

Doctor Have Lots Stress Due To Covid And Also Includes Harassment By Relatives Of Patients Says Bombay High Court
महाराष्ट्र मुंबई

डॉक्टरांना असा मानसिक त्रास होता कामा नये – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : ‘डॉक्टर कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात रात्रंदिवस काम करत आहेत. कित्येकांवर कामाचा प्रचंड ताण आहे. असे असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना स्पष्टीकरणही देत बसावे लागत असेल तर त्यांना असा मानसिक त्रास होता कामा नये’, असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. डॉ. राजीव जोशी यांनी अॅड. नितीन देशपांडे यांच्यामार्फत कोरोनाविषयक याचिका तसेच […]

7 boys gang raped 10 year old girl in gurugram six accused are minors
क्राईम देश

धक्कादायक! 10 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 आरोपी 10 ते 12 वयाचे, सोशल मीडियावर व्हिडिओ बघितल्यावर झाला खुलासा

हरियाणा : हरियाणाच्या रेवाडी येथे 24 मे रोजी काही मुले मैदानात खेळत होते, त्यानंतर खेळता-खेळता ते जवळच्या शाळेच्या इमारतीत गेली. तेथे 10 वर्षाच्या मुलीवर 7 मुलांनी सामूहिक बलात्कार केला. परंतु, ही घटना एका आठवड्यानंतर उघडकीस आली, जेव्हा पीडित मुलीच्या शेजाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला. त्यानंतर या व्यक्तीने तात्काळ याबाबत मुलीच्या कुटुंबियांना माहिती दिली, […]

Actress Aisha Sultana
देश राजकारण

अभिनेत्री आयशा सुलतानावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल, मोदी सरकारविरुद्ध केलेले ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवले

लक्षद्वीप : अभिनेत्री आणि मॉडेल आयशा सुलताना हिच्यावर गुरुवारी लक्षद्वीप पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.  लक्षद्वीप बेटांच्या जनतेविरूद्ध मोदी सरकारने कोविड -१९ चा ‘जैव-शस्त्र’ म्हणून वापर केल्याचा वादग्रस्त दावा केल्याने आयशा सुलताना हिच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपाच्या लक्षद्वीप युनिटचे अध्यक्ष सी अब्दुल खादर हाजी यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कावरट्टी पोलिस ठाण्यात गुन्हा […]

lpg cylinder refill becomes easier chose distributor of your choice
अर्थकारण देश

मोठी बातमी : गॅस सिलिंडर भरणे होणार सोपे, आता हवा तो वितरक निवडता येणार, जाणून घ्या या सुविधेविषयी..

मुंबई : एलपीजी सिलिंडर रिफिल केल्यांतर त्याची घरपोच डिलिव्हरी होण्यासाठी आता ग्राहक आपल्या सोईनुसार वितरक निवडू शकतील. त्यामुळे ग्राहकांना कमी वेळेत लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय लवकरच नवी सुविधा सुरु करणार आहे. या सुविधेचे नाव डिजिटल एलपीजी पोर्टेबिलिटी असे आहे. या सुविधेनुसार ग्राहक आपल्या सोईनुसार एपीजी सिलिंडर वितरक निवडू शकतील. […]

pune mahatma phule mandai fire
पुणे महाराष्ट्र

पुण्यातील प्रसिद्ध ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईला आग..

पुणे : पुण्यातील महात्मा फुले मंडईच्या आतील बाजूच्या छताला आग लागल्याची घटना घडली असून या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मध्य रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा फुले मंडई ही ब्रिटिश कालीन वास्तू असून आतील […]

brazilian wife cuts her husband penis and cooks in a frying pan after argument about splitting up
क्राईम ग्लोबल

विकृतीचा कळस! महिलेने पतीची हत्या केली, त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पॅनमध्ये शिजवला…

ब्राझील : ब्राझीलमधील एका महिलेला तिच्या पतीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि नंतर तो तेलात शिजवल्याचा आरोप आहे. ब्राझीलच्या साओ गोन्कालो शहरात ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय दयाने क्रिस्टीना रोड्रिग्स मचाडो या आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली. आरोपी महिलेच्या शेजार्‍यांनी […]

Woman Committed Suicide With Her 5 Daughters After Family Dispute In Chhattisgarh
देश

महिलेने तिच्या 5 मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून केली आत्महत्या, कारण…

छत्तीसगड : महासमुंद येथे बुधवारी रात्री उशिरा एका महिलेने तिच्या 5 मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर 50 मीटर अंतरावर सर्व मृतदेह विखुरलेले आढळले. मरण पावलेली सर्व मुली 10 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत. मद्यधुंद पतीबरोबर वाद झाल्यानंतर या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस […]

Asian Games gold-winning boxer Dingko Singh
क्रीडा

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे माजी बॉक्सर डिंगको सिंह यांचे निधन

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे माजी बॉक्सर डिंगको सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. त्यांना यकृताचा कर्करोग झाला होता आणि 2017 पासून ते या आजाराशी झुंज देत होते. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. क्रीडामंत्री किरेन रिजिजू ट्विट करत म्हणाले कि, “श्री. डिंगको सिंह यांच्या निधनामुळे मला अतिशय वाईट वाटते. […]