What exactly are the 'Red', 'Orange', 'Green' and 'Yellow' alerts issued by the Meteorological Department
महाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांत रेड अलर्ट

मुंबई : हवामान विभागाकडून पुणे, सातारा आणि रत्नागिरीत आज (17 जून) रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. […]

father killed seven year old son police arrested
क्राईम देश

वडिलांनी केली सात वर्षाच्या मुलाची हत्या, अगोदर पाण्याच्या टाकीत फेकलं, दगड मारले आणि…

राजस्थान : राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात एका विक्षिप्त वडिलांनी आपल्या सात वर्षाच्या निरागस मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी मुलारामने आपल्या मुलाला उचलून पाण्याच्या टाकीत फेकले, त्यानंतर दगड मारून त्याला जखमी केले. या मुलाने टाकीबाहेर येण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वडिलांनी टाकीचे झाकण बंद करून टाकले. त्यामुळे या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या […]

Father rapes his 9-year-old daughter
क्राईम नांदेड महाराष्ट्र

जन्मदात्या वडिलांनी केला ९ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

नांदेड : जन्मदात्या वडिलांनी ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर येथे ही संतापजनक घटना घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीला चार मुली आहेत. त्यातील एका मुलीचं लग्न झालेलं आहे. ही घटना घडली त्या रात्री […]

NIA arrests former mumbai police officer pradeep sharma
महाराष्ट्र मुंबई

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना NIA कडून अटक

मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. एनआयएनं आज पहाटे शर्मा यांच्या घरावर धाड टाकली होती. त्यांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक करण्यात आले आहे. आज प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतल्या निवासस्थानी पहाटे एनआयएच्या टीमने धाड टाकली होती. […]

wife murdered sleeping husband by pouring boiling sugary water on him
क्राईम ग्लोबल

भयंकर कृत्य! महिलेने तीन किलो साखर घालून उकळलेले पाणी नवऱ्याच्या अंगावर फेकले, आणि…

इंग्लंड : एका महिलेने आपल्या 81 वर्षीय पतीवर साखर घालून उकळलेले पाणी ओतले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या 59 वर्षीय महिलेचे नाव कोरीना बेन्स आहे. ही महिला एका किरकोळ कारणावरून नवऱ्यावर नाराज झाली होती. त्यातून तिने हे भयंकर कृत्य केले. आता या प्रकरणात कोरीनाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

massive explosion in a firecracker factory sound heard up to 5 km away
महाराष्ट्र

फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट, मदत आणि बचावकार्य सुरू

पालघर : पालघरच्या डहाणू तालुक्यातील देहाणे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज ५ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. तर, सुमारे पाच ते १० किलोमीटर परिसरातील घरांना या स्फोटामुळे मोठे धक्के जाणवले. कारखान्यातून निघणारा धूर कित्येक किलोमीटर अंतरावरही दिसंत आहे. […]

Important information given by the Minister of Education regarding 10th-12th examinations
देश शैक्षणिक

बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला ठरला, CBSE बारावीचे निकाल 31 जुलैला होणार जाहीर

नवी दिल्ली : सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला आज (17 जून) सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. ३१ जुलै रोजी CBSE चे निकाल जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल आक्षेप आहे, त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परिक्षेला बसता येणार आहे, असं केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं. सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या 13 सदस्यीय सम‍ितीने […]

yemen rebels publicly execute 3 men for rape, murder
ग्लोबल

लहान मुलांच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपींना भर चौकात घातल्या गोळ्या, नंतर क्रेनने लटकवले मृतदेह..

सना : लहान मुलांच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींना भर चौकात गोळ्या मारून ठार करण्यात आले. येमेनची राजधानी सना शहरात इराणचा पाठिंबा असलेल्या हुती बंडखोरांनी ही शिक्षा दिली. येमेनमध्ये २०१८ नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे शिक्षा देण्यात आली आहे. हे आरोपी बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी आढळले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी येमेनचे नागरीक आहेत. या […]

Zebronics Zeb-Fit4220ch Smart Fitness Watch Launched in india
गॅझेट्स तंत्रज्ञान

मस्तच! Zebronics चे स्मार्टवॉच भारतात लॉन्च, कॉलिंगसह अनेक जबरदस्त फीचर्स, जाणून घ्या..

नवी दिल्ली : Zebronics ZEB-FIT4220CH स्मार्टवॉच भारतात लॉन्च करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचमध्ये कॉलिंग फीचर उपलब्ध असून, वॉचद्वारे थेट फोन करता येईल आणि कॉलला उत्तर देखील देता येईल. या वॉचमध्ये ब्लड प्रेशर मॉनिटर देखील मिळतो. भारतात या स्मार्टवॉचची किंमत ३,१९९ रुपये असून, हे वॉच Amazon India वरून खरेदी करता येईल. हे स्मार्टवॉच ब्लॅक विद मॅचिंग […]

Firing on A Gram Panchayat member in Nevasa
अहिल्यानगर महाराष्ट्र

धक्कादायक : ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार, पाच गोळ्या झाडून हल्लेखोर पसार

अहमदनगर : नेवासा तालुक्यात बऱ्हाणपूर ग्रामपंचायत सदस्यावर पाच गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून त्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर नगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संकेत चव्हाण मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कांगोणी […]