Important information given by the Minister of Education regarding 10th-12th examinations

बारावीच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला ठरला, CBSE बारावीचे निकाल 31 जुलैला होणार जाहीर

देश शैक्षणिक

नवी दिल्ली : सीबीएससीने विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला आज (17 जून) सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. ३१ जुलै रोजी CBSE चे निकाल जाहीर होतील. ज्या विद्यार्थ्यांना निकालाबद्दल आक्षेप आहे, त्यांना परिस्थिती सामान्य झाल्यावर पुन्हा परिक्षेला बसता येणार आहे, असं केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेची गुणपत्रिका तयार करण्यासाठी बनवलेल्या 13 सदस्यीय सम‍ितीने सुप्रीम कोर्टात आपला अहवाल सादर केला. सीबीएसईने सांगितलं की, अंतिम निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावी गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयातील सर्वाधिक गुण घेतले जातील. तर अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेतली जाईल, तसंच बारावीच्या युनिट, टर्म आणि प्रॅक्टिकलचे गुण अंतिम निकाल बनवण्यासाठी घेतले जातील. दहावीचे 30 टक्के, अकरावी 30 टक्के आणि बारावीच्या 40 टक्के गुणांच्या आधारावर अंतिम निकाल बनवला जाईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत