Father rapes his 9-year-old daughter
क्राईम नांदेड महाराष्ट्र

जन्मदात्या वडिलांनी केला ९ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

नांदेड : जन्मदात्या वडिलांनी ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर येथे ही संतापजनक घटना घडली. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, या आरोपीला चार मुली आहेत. त्यातील एका मुलीचं लग्न झालेलं आहे. ही घटना घडली त्या रात्री (१५ जून) त्याची पत्नी आणि दोन मुली घराबाहेर अंगणात झोपल्या होत्या. तर ९ वर्षांची चिमुकली वडिलांसोबत घरात झोपली होती. रात्री ३ वाजेच्या सुमारास घरात झोपलेल्या ९ वर्षाच्या पोटच्या मुलीवर नराधम वडिलांनी अत्याचार केला. घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे पीडित मुलीच्या आईनं घरात जाऊन पहिले, तेव्हा मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. तिने पतीला याबाबत विचारले असता त्याने भांडण करण्यास सुरुवात केली आणि पत्नीला मारहाण केली.

भयंकर कृत्य! महिलेने तीन किलो साखर घालून उकळलेले पाणी नवऱ्याच्या अंगावर फेकले, आणि…

पीडितेच्या आईने नराधम वडिलांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. नांदेड ग्रामीण ठाण्यात पोलिसांनी पीडितेच्या बापाविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यातर्गंत गुन्हा दाखल करुन घेतला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

लहान मुलांच्या हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपींना भर चौकात घातल्या गोळ्या, नंतर क्रेनने लटकवले मृतदेह..

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत