Classes V to VIII will start soon, informed the Education Minister
महाराष्ट्र शैक्षणिक

पाचवी ते आठवीचे वर्ग ‘या’ तारखेपासून होणार सुरु, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मागच्यावर्षी राज्यातील शाळा बंद होत्या. आता शाळा सुरु होत आहेत. नववी ते बारावीचे वर्ग अगोदरच सुरु झाले होते. आता सरकारने पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली कि, येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतील.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे कि, “मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते”

शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत