भारताचा सलामीवीर पृथ्वी शॉ ऑस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेडच्या टेस्टमध्ये अपयशी ठरला. सलामीला येणाऱ्या फलंदाजाकडून अशी कामगिरी बिलकूल अपेक्षित नाही. याच कारणामुळे पहिल्या टेस्टमध्ये अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉ याला पुढील तिन्ही टेस्ट मॅचसाठी वगळले जाण्याची शक्यता आहे, असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान म्हणाला. पृथ्वी शॉ सलग दोन्ही डावांमध्ये क्लीनबोल्ड झाला. पहिल्या डावात पृथ्वीला स्टार्कने बाद […]
टॅग: क्रिकेट
India Vs Australia 1st ODI : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वन डे मॅचमध्ये भारताचा ६६ धावांनी पराभव
AUS vs IND : पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५० ओव्हरमध्ये ६ बाद ३७४ धावा केल्या. भारताची सुरुवात आश्वासक झाली नाही. शिखर धवन आणि हार्दिक पंड्या यांनी भागीदारी करत डाव सावरला परंतु त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले […]
मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटूला मुंबई विमानतळावर पोलिसांनी घेतले ताब्यात
मुंबई : मुंबई इंडियन्सचा स्टार क्रिकेटपटू कृणाल पांड्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. कृणाल पांड्याकडे नियमाप्रमाणे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सोने सापडल्यानंतर डीआरआयनं त्याला ताब्यात घेतलं आहे. मुंबई विमानतळावर जास्त सोनं आणल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत होता.
IPL 2020 MI vs DC : मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा घातली आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी
दुबई : मुंबई इंडियन्सने यावर्षीच्या आयपीएलच्या जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान सहजरित्या पेलले आणि जेतेपद पटकावले. मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले, आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत […]
DC vs SRH दिल्लीचा विजय; अंतिम सामन्यात मुंबईशी भिडणार
अबुधाबी : आयपीएलच्या क्वालिफायर 2 मॅचमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय झाला. आता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी फायनल होणार आहे. शिखर धवनची अर्धशतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरच्या फटकेबाजीच्या आधारावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले. दिल्लीने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 189 धावा केल्या. दिल्लीकडून शिखर धवनने 78 धावांची खेळी केली. […]
IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादचा ६ गडी राखून विजय; बंगळुरूचे आव्हान संपुष्टात
अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. […]
दिल्लीने बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली; बंगळुरूलाही प्लेऑफचं तिकीट
IPL 2020 Match 55 DC vs RCB : दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली. या विजयामुळे मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम आयपीएल २०२० स्पर्धेच्या ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल झाल्या. अजिंक्य रहाणे (६०) आणि शिखर धवन (५४) यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं […]
चेन्नईचा ९ विकेट राखून विजय; ऋतुराज गायकवाड पुन्हा चमकला
IPL २०२० : कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेल्या १५४ धावांच्या आव्हानाचा चेन्नई सुपरकिंग्सने यशस्वी पाठलाग केला. चेन्नईने १८.५ ओव्हरमध्ये १ बाद १५४ धावा केल्या. पुणेकर ऋतुराज गायकवाडने सलग तिसरं अर्धशतक झळकावत चेन्नईला दणदणीत विजय मिळवून दिला. #CSK end their #Dream11IPL 2020 campaign on a winning note. Beat #KXIP […]
मुंबई इंडियन्सचा ९ विकेट राखून विजय, इशान किशनची दमदार खेळी
IPL 2020 : MI vs DC मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ९ गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने दिलेले १११ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने १४.२ ओव्हरमध्येच पूर्ण केले. मुंबईने १ विकेट गमावून १११ धावा केल्या आणि मॅच ९ विकेट राखून जिंकली. […]
राजस्थानचा ७ विकेट राखून विजय, पंजाबसाठी गेलची दमदार खेळी
अबुधाबी : पंजाब वि. राजस्थान ही मॅच ७ विकेट राखून राजस्थानने जिंकली. बेन स्टोक्सच्या ५० तर संजू सॅमसनच्या ४८ धावांमुळे राजस्थानला पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणे शक्य झाले. रॉबिन उथप्पा, स्टीव्ही स्मिथ आणि जोस बटलरच्या छान खेळीमुळे विजय सोपा झाला. किंस इलेव्हन पंजाबने राजस्थानला १८६ धावांचे आव्हान दिले होते. गेलेच्या झंझावाती खेळीमुळे मिळालेले हे आव्हान […]










