अबुधाबी : पंजाब वि. राजस्थान ही मॅच ७ विकेट राखून राजस्थानने जिंकली. बेन स्टोक्सच्या ५० तर संजू सॅमसनच्या ४८ धावांमुळे राजस्थानला पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणे शक्य झाले. रॉबिन उथप्पा, स्टीव्ही स्मिथ आणि जोस बटलरच्या छान खेळीमुळे विजय सोपा झाला.
किंस इलेव्हन पंजाबने राजस्थानला १८६ धावांचे आव्हान दिले होते. गेलेच्या झंझावाती खेळीमुळे मिळालेले हे आव्हान सांघिक खेळी करुन राजस्थान रॉयल्सने १८व्या ओव्हरमध्येच पूर्ण केले. त्यांनी १७.३ ओव्हरमध्ये ३ बाद १८६ धावा केल्या.
That’s that from Match 50.@rajasthanroyals WIN by 7 wickets.#Dream11IPL pic.twitter.com/ILJXeG6JRm
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020
रॉबिन उथप्पा आणि बेन स्टोक्स या जोडीने ६० धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्स ५० धावा करुन बाद झाला. ख्रिस जॉर्डनने त्याला दीपक हूडाकरवी झेलबाद केले. स्टोक्सच्या खेळीमुळे प्रेरित होऊन उथप्पाने ३० धावा केल्या. संजू सॅमसनने ४८ धावा केल्या. स्मिथने ३१ धावा केल्या तर बटलरने नाबाद २२ धावा केल्या.
सुसाट खेळून राजस्थानला दमदार सुरुवात करुन देणाऱ्या बेन स्टोक्सने गोलंदाजी करताना केएल राहुल आणि निकोलस पूरन यांची विकेट घेतली. तसेच फलंदाजीत झटपट अर्धशतकी खेळी केली. स्टोक्सच्या या योगदानाची दखल घेत त्याला मॅन ऑफ द म२च पुरस्कार देण्यात आला.
किंग्स इलेव्हन पंजाबने (Kings XI Punjab) राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) १८६ धावांचे आव्हान दिले होते. प्रथम फलंदाजी करणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबने २० ओव्हरमध्ये ४ बाद १८५ धावा केल्या. गेलच्या ९९ धावा आणि केएल राहुलच्या ४६ धावांच्या जोरावर पंजाबने ही मजल मारली. सलामीवीर केएल राहुल आणि ख्रिस गेल यांची जोडी जमली. दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्सने राहुल तेवतियाकरवी केएल राहुलला झेलबाद केले. केएल राहुलने ४१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या.
पॉईंट टेबलं वर एक नजर :
It’s getting a tad interesting here at the Points Table. What are your predictions for the playoffs?#Dream11IPL pic.twitter.com/xcXTYIpWdg
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020