IPL २०२० : आयपीएलचा 50 वा सामना अबू धाबीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. स्मिथने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला. अंकित राजपूतची जागा घेण्याची संधी वरुण आरोनला मिळाली. पंजाब संघात कोणताही बदल झाला नाही.
#RR have won the toss and they will bowl first against #KXIP #Dream11IPL pic.twitter.com/AbQzubBNr8
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020
राजस्थानचा हा 13 वा सामना आहे जो त्यांच्यासाठी एलिमिनेटर सारखा आहे. हा सामना गमावल्यास राजस्थानसाठी प्ले-ऑफचे दरवाजे बंद होतील आणि ते स्पर्धेतून बाहेर पडतील. त्याचबरोबर पंजाबला आपला 7 वा विजय नोंदवून पॉइंट टेबलमध्ये चौथे स्थान कायम राखण्यास आवडेल.